Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: डाॅ.वेंकटेश कोलावार यांचा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. १३ मार्च २०२४) -         मंगळवारी अहेरी येथे झालेल्या मुन्नूरु कापेवार (धनोजे कुणबी) समाज मेळाव्यात र...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १३ मार्च २०२४) -
        मंगळवारी अहेरी येथे झालेल्या मुन्नूरु कापेवार (धनोजे कुणबी) समाज मेळाव्यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांच्या हस्ते विठ्ठल मंदिर वार्ड येथील डाॅ. वेंकटेश कोलावार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. (Dr. Venkatesh Kolawar)

        डाॅ. वेंकटेश कोलावार हे नुकतेच क्रिग्रीस्तान देशातून एम.बी.बी.एस शिक्षणाची पदवी उत्तमरित्या पूर्ण करुन भारतात आलेले आहेत. डॉ. वेंकटेश कोलावार हे त्यांचा मूळ गाव असलेल्या सिरोंचा शहरातील कापेवार समाजातील (कुणबी) पहिले एम.बी.बी.एस पदवीधारक आहेत. त्यांनी केलेल्या उत्तम यश संपादनबद्दल सदर सत्कार करण्यात आला आहे. त्यांनी या यशाचे श्रेय आई - वडील प्रमिला चंद्रय्या कोलावार, मोठे बंधू - वहिनी प्रियंका सतिश कोलावार, मजवे बंधू - वहिनी अरुणा तिरुपती कोलावार, तिसरे बंधू महेश कोलावार, पुतण्या गर्व कोलावार, पुतणी चकोर कोलावार व काका, काकू, चुलत बंधू व आपल्या गुरूजणांना दिले आहे. (aamcha vidarbha) (chandrapur)



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top