Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर होताच भाजपा बल्लारपूर तर्फे स्वागत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधी बल्लारपूर (दि. १४ मार्च २०२४) -          नुकतीच महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये व मत्स्यव्यव...

आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधी
बल्लारपूर (दि. १४ मार्च २०२४) -
         नुकतीच महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये व मत्स्यव्यवसाय मंत्री विकासपुरुष सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूर लोकसभेसाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -आरपीआय महायुतीचे उमेदवार म्हणून घोषणा झाली. सदर उमेदवारीचे बल्लारपूर शहरात फटाके फोडून स्वागत करण्यात आले. उमेदवारी ची घोषणा होताच स्थानिक कार्यकर्ते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयजवळ एकत्रित झाले. यावेळी भाजपा ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष व  माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा चे शहर अध्यक्ष काशिनाथ सिंह, वैशाली जोशी, संजय मुप्पीडवार, गुलशन शर्मा, छगन जुलमे, देवेंद्र वाटकर, सतीश कनकम, किशोर मोहुर्ले, अरुण वाघमारे, घनश्याम बुरडकर, राजेश शाहा, स्वामी रायबरम, कंदकुरी अन्ना, राजु दासरवार, ओमप्रकाश प्रसाद, अरुण मोगरे, सुरेंद्र खडका, कैलाश गुप्ता, प्रमोद रामिल्लावार, हरी लंका, शुभम बहुरीया, राजेश कैथवास, मनीष पोळशेट्टीवार, दिपक कांचर्लावार, प्रशांत दारला, संजय प्रसाद, गुड्डू साहु, रींकु गुप्ता, प्रतीक बारसागडे, साई अर्गेलवार व कार्यकर्ते उपस्थित होते. आजपर्यंत सुधीर भाऊंनी महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे परिसरात अभूतपूर्व असा विकास केला आहे. आता केंद्र सरकारच्या माध्यमातून यापेक्षा मोठा विकास होईल अशी भावना हरीश शर्मा यांनी व्यक्त केली. (aamcha vidarbha) (ballarpur) (BJP)



Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top