Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २५ जानेवारी २०२४) -         भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या कलबद्ध वेळापत्रकानुसार 1 जानेवारी 2...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २५ जानेवारी २०२४) -
        भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या कलबद्ध वेळापत्रकानुसार 1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर 70 राजुरा विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी मंगळवार दिनांक 23 ला उपविभागीय अधिकारी कार्यालय राजुरा आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरीव विधानसभा मतदार क्षेत्रातील 329 मतदान केंद्रावर मतदारांचा माहितीस व अवलोकना करिता प्रसिद्ध प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व मतदारांनी सदर निरीक्षण करून आपले नांव मतदार यादीत तपासून घ्यावे व येणाऱ्या आगामी लोकसभा व विधानसभा 2024च्या निवडणूकी मध्ये नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांनी मतदारांना केले आहे. (aamcha vidarbha) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top