Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नागपुर-गडचांदूर बस फेऱ्या कोरपना पर्यंत वाढविण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दुर्गम भागातील नागरिकांची थेट बस सेवेअभावी गैरसोय आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. १८ जानेवारी २०२४) -         क...

दुर्गम भागातील नागरिकांची थेट बस सेवेअभावी गैरसोय
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. १८ जानेवारी २०२४) -
        कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथून नागपूर साठी तीन ते चार थेट बस फेऱ्या धावतात. या बस फेऱ्या कोरपना पर्यंत वाढविण्यात याव्या अशी मागणी प्रवाश्यांकडून होते आहे. कोरपना हे गांव तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्हा सीमेवरील शेवटचे तालुक्याचे ठिकाण व महत्त्वाचे शहर आहे. मात्र येथून एकही थेट राज्याची उपराजधानी व विभागाचे मुख्यालय असलेल्या नागपूर साठी बस फेरी नाही. परिणामी व्यापारिक खरेदी, प्रशासकीय कार्य,  कार्यालयीन, वैद्यकीय, शैक्षणिक व इतर कामासाठी जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते आहे. बसेसच्या संपापूर्वी राजुरा-नागपूर ही बस कोरपना-वणी मार्गे थेट बस सेवा सुरू होती. बसेसचा संप मिटला मात्र बस सेवा पूर्ववत करण्यात आली नाही. त्यामुळे कोरपना सह परिसरातील तेलंगणा राज्य, यवतमाळ जिल्ह्यातील शंभरहून अधिक गावातील ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. कोरपना हे मध्यवर्ती स्थान असल्याने येथे अनेक शासकीय निमशासकीय कार्यालय, बँका, शैक्षणिक संस्था, मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे येथील रेलचेल मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय येथून विदर्भातील दुसरे मोठे शहर असलेले अमरावती, मराठवाड्यातील किनवट, तेलंगणातील आदिलाबाद, उटनुर, यवतमाळ जिल्ह्यातील वणी, जिल्ह्यातील चंद्रपूर, राजुरा, वरोरा, गडचांदूर व ग्रामीण भागातील परसोडा, पारडी, कोडशी बू आदी ठिकाणी साठी बस फेऱ्या धावतात. गडचांदूर वरून  जाणाऱ्या बस फेऱ्या वीस किलोमीटर अंतर कोरपना पर्यंत अतिरिक्त वाढविल्यास परिसरातील नागरिकाची अडचण दूर होईल. या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभाग नियंत्रक व राजुरा येथील आगार व्यवस्थापकांनी लक्ष देऊन नियोजन करणे आवश्यक आहे. 

भोयगाव मार्गे बसफेरी बंदच
        चंद्रपूर-भोयगाव-कोरपना ही कोरोना पूर्वी थेट बस फेरी होती. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी अत्यंत सोयीस्कर होते. मात्र ही बस रस्ता नादुरुस्तीचे कारण देत बंद ठेऊन आहे. मात्र आता हा रस्ता पूर्णत पुलाच्या बांधकामासह सुस्थितीत झाला. त्यामुळे ही बस फेरी पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी अपेक्षा या भागातील ग्रामस्थ कडून होते आहे. ही बस फेरी सुरू झाल्यास चंद्रपूर व कोरपना तालुक्यातील गावातील प्रवाशांना जिल्हा मुख्यालय व तालुका स्थळी जाण्या-येण्याची अडचण दूर होईल. ही बस फेरी आठवडाभरात सुरू न केल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे. (aamcha vidarbha) (korpana)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top