Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: क्षयरोग रुग्णांना दिला मदतीचा हात पोषण आहर किट चे वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शरद जोगी मित्र मंडळातर्फे कोरपना व जिवती तालुक्यातील पोषण आहर किट चे वाटप आमचा विदर्भ -  राजुरा (दि. ३० जानेवारी २०२४) -         भारत सरकारन...

शरद जोगी मित्र मंडळातर्फे कोरपना व जिवती तालुक्यातील पोषण आहर किट चे वाटप
आमचा विदर्भ - 
राजुरा (दि. ३० जानेवारी २०२४) -
        भारत सरकारने वर्ष 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याअनुषंगाने प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत 'कम्युनिटी सपोर्ट टू टीबी पेशंट्स' हा उपक्रम संपूर्ण भारत देशामध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत उपचाराखाली असलेल्या व संमती दिलेल्या सर्व क्षय रुग्णांना सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था व समाजातील दानशूर व व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींची नोंद निक्षय मित्र (Nikshay Mitra) म्हणून करून त्यांच्या मार्फत क्षयरोग रुग्णांना अतिरिक्त पोषण आहार किट देण्याकरिता केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री टीबी मुक्त अभियान राबविण्यात येत आहे. शासकीय आरोग्य योजनांमधून क्षयरोग नियंत्रणासाठी निःशुल्क औषोषधोपचार व मासिक पाचशे रुपये अनुदान मिळते, मात्र ग्रामीण भागातील रुग्णांना औषोषधोपचारासह सकस पोषण आहार फार गरजेचा असून याच अनुषंगाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी (Sharad Jogi) यांनी मदतीचा हात दिल्याने कोरपना व जिवती तालुक्यातील दहा क्षयरोग रुग्णांना याचा लाभ मिळणार आहे. (Prime Minister TB Free India Campaigns) ('Community Support to TB Patients')

         (Sharad Bhau Jogi Mitra Mandal) शरद भाऊ जोगी मित्र मंडळातर्फे कोरपना व जिवती तालुक्यातील दहा क्षयरोग (TB) रुग्णांना सकस पोषण आहर किट चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शहरातील दानशूर व्यक्तिमत्व व नप उपाध्यक्ष शरद जोगी, प्रमुख पाहुणे आरोग्य व पाणीपुरवठा सभापती विक्रम येरणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल टेंभे, आरोग्य सहाय्यक देवाळकर व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जिवती व कोरपना येथील सर्व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवाळकर, सूत्रसंचालनशी कल्पक ठमके तर आभार प्रदर्शन सचिन बर्डे यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा राजे हिरेमठ यांनी सांगितली. यशस्वितेकरिता चंद्रशेखर पारखी, सचिन बर्डे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (aamcha vidarbh) (gachandur)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top