Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: राजुरा-वरुर रोडवरील साईकृपा पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बंदुकीच्या धाकावर पेट्रोल पंपातील रोख 1 लाख 90 हजार लुटले अवघ्या 12 तासाच्या आत पोलिसांनी आवळल्या मुसक्या; 5 आरोपी अटकेत आमचा विदर्भ - दीपक ...

बंदुकीच्या धाकावर पेट्रोल पंपातील रोख 1 लाख 90 हजार लुटले
अवघ्या 12 तासाच्या आत पोलिसांनी आवळल्या मुसक्या; 5 आरोपी अटकेत
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 6 जानेवारी 2024) -
        राजुरा-आसिफाबाद मार्गावरील वरूर रोड जवळील आणि राजुरा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील साईकृपा पेट्रोल पंप येथे दिनांक 6 जानेवारी ला पहाटे 3 वाजताच्या सुमारास दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवित दरोडा घातला. तोंडाला पट्टे बांधून, हातात शस्त्र घेऊन असलेल्या अज्ञात आरोपींनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांंना बंदुकी व कोयता चा धाक दाखवून लोखंडी कपाटातून 1 लाख 93 हजार 853 रूपये लुटून नेले. तसेच ऑफिसातील डीव्हीआर व एलईडी ची तोडफोड करत कर्मचाऱ्यांचीच मोटारसायकल व मोबाईल घेऊन पळून गेले. सदर घटना पहाटे तिन वाजताच्या सुमारास घडली. (Within just 12 hours, the police opened the door; 5 accused in custody)

        साईकृपा पेट्रोल पंप हा दिलबाग तांडा यांच्या मालकीचा असुन येथे दिनांक 6 जानेवारीला पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. हा भाग विरूर स्टेशन पोलीस स्टेशन हद्दीत आहे. रात्री पेट्रोल पंपावर राखणदार करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून कपाटातील रोख रक्कम लुटून नेली. घटनेची माहिती होतास पोलीस पोलिसांनी नाकाबंदी करत याबद्दलची माहिती तात्काळ पहाटेच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी याना दिली. पहाटेच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा व इतर पोलीस स्टेशन मधून वेगवेगळे पथक तयार करून त्यांचेकडून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन अवघ्या 12 तासाच्या आत पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी मारोती सुरेश शेरकुरे वय 31, दीपक शंकर देवगडे वय 22, नंदकिशोर रवींद्र देवगडे वय 19, रा. पारधीगुडा, महेश बाबू देवगडे वय 22, रा. धोपटाळा,  अभिषेक दत्तू काळे वय 20 रा. खैरगाव याना अटक केली. आरोपींकडून मुद्देमालापैकी 56 हजार रुपये जप्त केले. (Saikrupa Petrol Pump Warur Road) (Police Station Rajura)


        सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. रविंद्रसिंह परदेशी (Dr. Ravindra Singh Pardeshi), अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू (Reena Janbandhu), उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार (Mahesh Kondawar), राजुरा पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, विरूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल, सपोनि धर्मेंद्र जोशी, सपोनि संतोष वाकडे, कोरपना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे व पथक, सपोनि विकास गायकवाड पोलीस स्टेशन कोठारी व त्यांचे पथक, सपोनि किशोर शेरकी उपपोलीस स्टेशन उमरी पोतदार व त्यांचे पथक यांनी केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक 08/2024 कलम 395, 398 अन्वये गुन्हा दाखल केला असून समोरील तपास विरूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल करीत आहे. (aamcha vidarbha) (rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top