Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मुलांना तेली समाजाचा गौरवशाली इतिहास व अत्याधुनिक शिक्षणाचे धडे द्या - संजय येरणे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त निघाली पालखी शोभायात्रा आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. 09 डिसेंबर 2023) -         तेली समाज...

श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त निघाली पालखी शोभायात्रा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 09 डिसेंबर 2023) -
        तेली समाज युवक मंडळ राजुरा - रामपूर द्वारा तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंतीचे औचित्य साधून भव्य पालखी शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. जूने बसस्थानक ते श्री संत संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक सभागृह, रामपूर, राजुरा अशी भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी संत संताजी जगनाडे महाराज, माता यमुनाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, घोड्यावर बसलेले वीर मावळे, सावित्रीबाई फुले आदींच्या भुमिकेत तेली समाजातील बालक बालकांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. पालखी शोभायात्रेचे ठिकठिकाणी विविध समाजबांधवांनी उत्स्फूर्त स्वागत केले, पुजन केले, यानंतर संत जगनाडे महाराज सांस्कृतिक सभागृह, रामपूर येथे जयंती सोहळा, आरती, मान्यवरांचे मार्गदर्शन, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तेली समाज बंधु भगीणींचे सत्कार, इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदविका, पदव्युत्तर विभागात सत्र २०२३ मधील गुणवंत विद्यार्थी, नवनिर्वाचीत लोक प्रतिनिधींचे सत्कार आणि महाप्रसाद असे विविध कार्यक्रम पार पडले. (Shri Sant Santaji Jaganade Maharaj Jayanti)

        यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त, संताजी एक योद्धा या कादंबरीचे लेखक संजय येरणे यांनी संत संताजी जगनाडे महाराज, माता यमुनाबाई, ताई तेलीन आणि तेली समाजातील संत, वीर महापुरुषांच्या इतिहास, शौर्यगाथा सांगितल्या. आणि तेली समाजाने मुलांना तेली समाजाचा गौरवशाली इतिहास व अत्याधुनिक शिक्षणाचे धडे द्यावे, तेली समाजाने संघटित होऊन प्रत्येक क्षेत्रात स्वाभिमानी कष्टाळू तेली समाजाची शक्ती, दबावगट निर्माण केला पाहिजे असे आवाहन केले. तर मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश पारखी यांनी संत परंपरा आणि ओबीसी चळवळीत तेली समाजाची भुमिका यावर मार्गदर्शन केले. तसेच गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा युवा आघाडी म. प्रा. तै. महा. चंद्रपूर जिल्हाध्यक्ष निलेश बेलखेडे, युवा आघाडी म. प्रा. तै. महा. चंद्रपूर जिल्हा कार्यध्यक्ष आशिष देवतळे यांनी देखील मार्गदर्शन केले. 

        यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आध्यात्मिक मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ते सुरेशराव बेले, प्रमुख अतिथी निवृत्त सुभेदार, राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त शंकरराव मेंगरे, विदर्भ तेली समाज महासंघाचे तालुकाध्यक्ष मधुकरराव रागीट, सचिव किशोर पडोळे, तेली स. क. मं. वेकोली अध्यक्ष देवराव चन्ने, सचिव सुरेश बुटले, मार्गदर्शक मंडळ सदस्य पांडुरंग चन्ने, शामराव खोब्रागडे, शंकरराव बानकर, मारोतराव येरणे, आनंदराव हिवरे, मधुकरराव बजाईत, वामनराव बावणे, श्रीमती जैनाबाई बाबूराव रागीट आदी मान्यवर उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेली समाज युवक मंडळाचे अध्यक्ष अनंता येरणे यांनी केले. सुत्रसंचालन मनिष मंगरुळकर आणि प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. देविदास कुईटे यांनी केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ तेली समाज मंडळ तालुका राजुरा, महिला तेली समाज मंडळ तालुका राजुरा, तेली समाज कल्याण मंडळ विकोली तालुका राजुरा, यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेली समाज युवक मंडळ राजुरा, रामपूर तालुका राजुराच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी यासह सर्व समज बंधु भगीणींनी अथक परिश्रम घेतले.

        यावेळी राजुरा मुक्ती संग्राम लढ्यात सहभागी मुक्ती संग्राम सेनानी दिवंगत गोविंदराव येरणे, तुकाराम हिवरे, जेष्ठ पत्रकार गणेश बेले, अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त संगीता रागीट, स्टाफ सिलेक्शन कमिशन परिक्षा उत्तीर्ण आयुषी हिवरे, पोलीस भरतीत यशस्वी करिष्मा रागीट, संगीत विशारद शिलाताई बेलखेडे, राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप मध्ये सहभागी प्रिया मंगरूळकर, नवनिर्वाचीत लोकप्रतिनिधी कृ. उ. बा. स. संचालक जगदीश बुटले, उपसरपंच निलकंठ खेडेकर, उपसरपंच राहुल बानकर, ग्रा.प. सदस्य प्रतिक्षा चन्ने, अतुल खनके, गुणवंत विद्यार्थी सुरज रागीट, देवयानी बुटले, आर्यन नरड, कस्तुरी बेले, तेजस्विनी वैरागडे, गायत्री टिपले, ईषा वैरागडे, साक्षी चन्ने, रोहित वैरागडे, श्वेता येरणे, वेदांती रागीट, रितेश हिवरे आदिंचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वर्गीय किसनराव रागीट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इयत्ता १० वी आणि १२ वीत तेली समाजातून तालुक्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना १००१ रुपये पारितोषिक देण्यात आले तर स्वर्गीय जैराम बेले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रमेश जैराम बेले यांनी समाजाला आवश्यक साहित्य खरेदीसाठी १६ हजार रुपयाचे दान दिले. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top