Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ग्रामिण आणि दुर्गम भागातील 'झोलाछाप डॉक्टर' झाले डॉक्टर साहेब...!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
झपाट्याने वाढत आहे बोगस डॉक्टरांची संख्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अभय..?? बोगस डॉक्टरमुळे रुग्णांना नुकसान झाल्यास जबाबदार कोण..?? आमचा विदर्भ...

झपाट्याने वाढत आहे बोगस डॉक्टरांची संख्या
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अभय..??
बोगस डॉक्टरमुळे रुग्णांना नुकसान झाल्यास जबाबदार कोण..??
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. 8 डिसेंबर 2023) -
        सुरुवातीला ग्रामिण आणि दुर्गम भागात लापुण छपुण चोरीने वैधकीय उपचार करणारे 'झोलाछाप डॉक्टर' (jholachap doctor) च्या नावाने ओळखले जाणारे बोगस डॉक्टर आता शहरी विभागात दवाखाना लावून राजरोसपणे लोकांचे उपचार करत आहे. कोरपना शहरासह संपूर्ण तालुक्यात अनेक बोगस डॉक्टरांची संख्या झपाट्याने वाढत असून याकडे संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. मेडिकल कौन्सिलची कोणतीही पदवी नसतानासुद्धा कोरपना सह नांदा, बिबी, वनसडी, पारडी, मांगलहिरा, खडकी, रुपापेठ या ठिकाणी बोगस डॉक्टरांनी बस्तान मांडले आहे. मुळातुन बंगाल आणि बिहार चे रहिवासी असल्याने त्यांना स्थानीय मराठी धड़ बोलता येत नसूनही गावागावांत जाऊन ते रुग्णांवर उपचार करीत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी असलेल्या मधुर संबंधाने त्यांचा हा धंदा राजरोसपणे सुरू असल्याचे उघडपणे दिसत आहे. 

        कोरपना तालुक्यात बोगस डॉक्टरने आपला धंदा थाटला आहे. विशेष करून बंगाली डॉक्टरांचा मोठा रैकेट कार्यरत असुन शासकीय अधिकाऱ्यांना पद्धतशीर मैनेज केल्याचे चित्र दिसत आहे. याकडे वैद्यकीय अधिकारी कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. कोरपना सारख्या तालुक्याच्या ठिकाणी आणि नांदा बिबी सारख्या औध्योगिक प्रगत झालेल्या ठिकाणी सुद्धा राजरोसपणे दवाखाना चालवित आहे तर ग्रामिण भागात तर मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांनी कब्जा केल्याचे दिसून येत आहे. असे असुनही संबंधित अधिकाऱ्यांना हा गैरप्रकार का दिसत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. कोरपना शहरासह अनेक ठिकाणी बोगस डॉक्टरांची संख्या सतत वाढतच आहे. येथील काही मेडिकल चालकांचाही रुग्णांना लुटून पैसे कमावण्याकरिता या बोगस डॉक्टरांना जोडीदार म्हणून साथ देता असल्याची  माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एलेक्ट्रोपैथीच्या नावाखाली अनेक बोगस डॉक्टर खुलेआम सलाईन, इंजेक्शन देऊन अलोपॅथीचा सर्रास वापर करून लाखों रुपये कमाऊन बसले आहे. औषध विकायची परवानगी नसतानाही बोगस डॉक्टर उपचार दरम्यान जास्तीत जास्त आपल्या झोल्यातीलच औषध रुग्णांना विकून कमाई केल्या जात आहे. संपूर्ण कोरपना तालुक्याभरात कमीत कमी 20 ते 25 बोगस डॉक्टर राजरोसपणे आपला धंदा चालवत आहेत. नाव न सांगण्या च्या अटिवर एक मेडिकल व्यसायी ने सांगितले की बोगस डॉक्टर आपल्या रुग्णांना दुसऱ्या मेडिकलमध्ये औषधी मिळू नये यासाठी विशिष्ट औषधसाठा घेऊन त्याच कंपनीची औषधी चिठ्ठीवर लिहून देत आहेत. त्यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांनी दुसऱ्या मेडिकलमधून औषधी आणली तर ती चालत नाही असे म्हणून परत पाठविण्यात ये आहे. या मनमानी कारभारामुळ जनतेची सर्रास लूट होत आहे. पारडी गावात तर एक बोगस डॉक्टर स्वताच औषधि विकत असल्याची धक्कादायक माहिती असुनही यावर संबंधित अधिकाऱ्यांन कारवाई का करीत नाही याचा लोकांना आश्चर्य वाटत आहे.

        संपूर्ण कोरपना तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर सक्रिय असतानासुद्धा यावर कोणतीही कारवाई होत नाही. वैद्यकीय अधिकारी व बोगस डॉक्टरांचे मधुर संबंध असल्याने याकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्या जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र यामुळे अशिक्षित, गरीब आदिवासी रुग्णांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. बोगस डॉक्टरमुळे रुग्णांना नुकसान झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन गरीबांची लूट थांबवावी अशी मागणी स्थानीय नागरिकांकडून होत आहे. (rajura) (aamcha vidarbha) 
        कोरपना तालुक्यात अनधिकृत वैद्यकीय खाजगी व्यवसाय करणाऱ्यवर गृह, महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग यांच्याशी समन्वय साधून कारवाई करण्यात येईलच तसेच लोकांनी सुद्धा जागरूक होऊन अशा अनाधिकृत वैद्यकीय व्यवसायिकांकडे जाणे टाळावे व अधिकृत पदवी असलेल्याच डॉक्टर कडून उपचार करून घ्यावा. त्याचप्रमाणे अनाधिकृत व्यवसायिकांवर कठोर कारवाई करण्यासाठी नवीन कठोर कायदे बनवने काळाची गरज आहे.
डॉ. स्वप्निल टेंभे
वैद्यकीय अधिकारी, कोरपना तहसील

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top