Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा येथे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन उत्साहात संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १ मे २०२४) -         तहसील कार्यालय राजुरा येथे १ मे मह...

आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १ मे २०२४) -
        तहसील कार्यालय राजुरा येथे १ मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाचे औचित्य साधून मुख्य शासकीय ध्वजारोहण लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सकाळी ठिक ८ वाजता उत्साहाने पार पडले. यावेळी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गाऊन उपस्थित सर्व मान्यवरांनी, शाळकरी मुलांनी महाराष्ट्राभिमान आणि देशाभिमान व्यक्त केला. आ. सुभाष धोटे यांनी उपस्थित सर्वांना आणि क्षेत्रातील समस्त नागरिकांना महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

          या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, सभापती विकास देवाळकर, उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, तहसीलदार ओमप्रकाश गौड, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, उपविभागीय कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी विनायक पायघन, नायब तहसीलदार डोणगावकर, गांगुर्डे, तेलंग, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, कार्यालयीन कर्मचारी, पत्रकार, समाजसेवक, महाविद्यालाचे प्राचार्य, प्राध्यापक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  (aamcha vidarbha) (vidarbha) (rajura) (chandrapur) 

#flaghoisting #maharashtradin #kamgardin #tahasilofficerajura

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top