Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: गावाच्या विकासासाठी खनिज विकास निधी द्यावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अखिल भारतीय सरपंच परिषदेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. 09 डिसेंबर 2023) -       ...

अखिल भारतीय सरपंच परिषदेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. 09 डिसेंबर 2023) -
        जिल्ह्यात मोठया प्रमाणात उद्योग आहेत या उद्योगांना अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गौण खनिज कोळसा उत्खनन करून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. काही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त उत्खनन करून कंपन्या मालामाल होताना दिसत आहे तर  दुसरीकडे प्रशासनाकडे जमा असलेला कोट्यवधी खनिज विकास निधी गावाच्या विकासासाठी दिला जात नसल्याची ओरड आता सरपंच करू लागले आहे. तेव्हा खनिज विकास निधी ग्रामपंचायतींना देऊन विकास कामे मंजुर करावी या मागणीसाठी अखिल भारतीय सरपंच परिषद तालुका कोरपना व दत्तक गाव सरपंच  संघटनेच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन देण्यात आले. 

        कंपन्यांचे प्रदूषण जड वाहतूक पिकांना होणारे नुकसान आणि आरोग्य विषयक समस्यामुळे गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र त्या प्रमाणात शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचेही अखिल भारतीय सरपंच परिषदेचे म्हणणे आहे लवकरात लवकर सदर मागण्या मान्य करून औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायतींना खनिज विकास निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप कोरपना तालुकाध्यक्ष अरूण काळे बाखर्डी  सरपंच अरूण रागीट, आवरपूर सरपंच प्रियंका दिवे, उप सरपंच बाळकृष्ण काकडे, बीबी उपसरपंच आशिष देरकर, हिरापूरच्या सरपंच सुनीता तुमराम, सांगोळ्याचे सरपंच संजना सचिन बोंडे, नोकारी येथील सरपंच संगीता मडावी, तळोदीं सरपंच ज्योती जेणेकर  भोयेगाव सरपंच शालिनी बोंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सोबत सदर शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांचीही भेट घेतली यादरम्यान दत्तक गाव  अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरातील पांदन रस्त्याने बाबत लवकरच कंपनी प्रशासनासोबत बैठक घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. (gadchandur) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top