Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गंभीर आजाराने ग्रस्त मुलीच्या उपचारासाठी धावली 'कोरपना युवा प्रतिष्ठान'
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना युवा प्रतिष्ठान तर्फे ४० हजाराची आर्थिक मदत आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. 09 डिसेंबर 2023) -         य...

कोरपना युवा प्रतिष्ठान तर्फे ४० हजाराची आर्थिक मदत
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. 09 डिसेंबर 2023) -
        येथील कोरपना युवा प्रतिष्ठान मागील काही वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक सामाजिक उपक्रमासोबत अनेक गोरगरीब गरजू  व आजारग्रस्त यांना मदतीचा हात पुढे करताना दिसत आहे. 

        कोरपना येथील वार्ड क्र.१४ मधील यासीम शेख यांची मुलगी सानिया यासिम शेख वय अंदाजे १८ वर्ष ही ल्युपस एरिथेमॅटोसस आजाराने ग्रस्त असल्याने सदर आजार ग्रस्त मुलीला आजार आणखी त्रासदायक होत असल्याने किडनी व हृदयावर वाईट परिणाम होत असल्यामुळे दिवसेंदिवस सानियाची प्रकृती बिघडत असून  आरोग्य खालावत चालले आहे व त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्यांना योग्य उपचार करता येत नाही ही बाब कोरपना युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन विजयराव बावणे तसेच त्यांच्या सर्व सदस्यांना माहिती मिळताच युवा प्रतिष्ठानने नेहमी प्रमाणे मदतीचा हात पुढे करीत सानियाच्या उपचाराकरिता रोख रक्कम (४००००/) चाळीस हजार रुपयांची आर्थिक मदत करून उपचाराकरिता नागपूर येथील एम्स हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. पुढील उपचाराकरिता येणारा संपूर्ण खर्च सुद्धा युवा प्रतिष्ठान तर्फे करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी इस्माईल शेख व नितीन बावणे यांची उपस्थिती होती

        या मदतीकरीता युवा प्रतिष्ठान कोरपनाच्या सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य असल्याने  सदर प्रकरण लक्षात घेता लोकांच्या मदतीसाठी युवा प्रतिष्ठान सदैव तत्पर असल्याचे सिद्ध झाले असून या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Korpana) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top