Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: प्रहारचे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांनी रक्ताने पत्र लिहून दिला पाठिंबा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दत्तक गाव सरपंच संघटनेच्या आमरण उपोषणाचा आज तीसरा दिवस स्वतंत्र भारत पक्षाचाही पाठिंबा आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचा...

दत्तक गाव सरपंच संघटनेच्या आमरण उपोषणाचा आज तीसरा दिवस
स्वतंत्र भारत पक्षाचाही पाठिंबा
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. 18 नोव्हेंबर 2023) -
        मागील 6 दिवसा पासून दत्तक गाव सरपंच संघटना व  अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या वतीने अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर विरोधात आमरण उपोषण सुरू आहे. या आमरण उपोषणाचा तोडगा अजूनही निघाला नाही या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश बिटकर यांनी उपोषणस्थळी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून उपोषणाला जाहिर पाठिंबा दिलेला आहे. 

        आपल्या संबोधनात ते म्हणाले सरपंच हा ग्रामविकासाचा कणा आहे आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये दत्तक गावातील कामे करणे कंपनीच्या सीएसआर फंड देणे बंधनकारक असल्याने सरपंचाची मागणी ही रास्त कंपनीने आंदोलन कर्त्याच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या काही दिवसातच रक्तदान आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. (Today is the third day of the fast to death of Dattak village sarpanch organization)

स्वतंत्र भारत पक्षाचाही पाठिंबा
        दत्तक गाव सरपंच संघटनेच्या या आंदोलनाला स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते माजी समाजकल्याण सभापती नीलकंठ कोरांगे यांनी भेट दिली. आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने यावेळी पाठिंबा जाहीर केला. यावेळी कोरपना कृषि उत्पन  बाजार समितीचे संचालक शेतकरी संघटनेचे नेते सुनील बावणे उपस्थित होते. (gadchandur) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top