Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सरपंच संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा बाजारपेठ कडकडीत बंद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रविवार पासून महिला सरपंच बसणार आमरण उपोषणाला आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. 18 नोव्हेंबर 2023) -         माग...

रविवार पासून महिला सरपंच बसणार आमरण उपोषणाला
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. 18 नोव्हेंबर 2023) -
        मागील सहा दिवसापासून नांदा फाटा येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ अल्ट्राटेक सिमेंट कारखान्याच्या दत्तक योजनेत असणाऱ्या गावाच्या सरपंचांनी ग्रामीण विकास निधी विनीयोग करिता विविध मागण्या संदर्भात साखळी उपोषणाला सुरुवात केली. ज्यामध्ये एकूण नऊ मागण्यांचा समावेश आहे. पाच दिवसाचा कालावधी लोटून ही कंपनी प्रशासनाच्या एकेकोर वृत्तीमुळे आंदोलनाला आता तीव्र स्वरूप प्राप्त झाले असून मागील दोन दिवसापासून अवारपुरचे उपसरपंच बाळकृष्ण काकडे आणि नांदा ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर चटप हे आमरण उपोषणाला बसलेले असून अद्याप पर्यंत अल्ट्राटेक सिमेंट कारखान्याच्या वतीने मागण्यांच्या संदर्भात कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे आता आंदोलनाची धार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. सरपंच संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शनिवारी संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. याशिवाय तोडगा न निघाल्यास रविवारपासून दहा महिला सरपंच हा स्वतः आमरण उपोषणाला बसत असल्याची माहिती पुण्यनगरी प्रतिनिधीला उपोषण करते रत्नाकर चटप यांनी दिली. कारखान्याच्या परिसरातील दत्तक गावाच्या विकासाकरिता दहा गावातील विविध पक्षाचे सरपंच एकत्रित येऊन उपोषणाला बसणे ही कदाचित महाराष्ट्र राज्यातील पहिलीच घटना असावी. उपोषणाला देण्याकरिता भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आम आदमी पार्टी, शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष, भीम आर्मी या पक्षांच्या विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत पाठिंबा दिलेला असून प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांनी उपोषण मंडपातच स्वताच्या रक्तांनी लिहिलेले पाठिंबा पत्र उपोषण करताना दिले यामुळे आंदोलनाची तीव्रता तर वाढत आहे मात्र स्थानिक महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून आंदोलनाबाबत उदासीनता दिसून येत आहे कंपनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला आमंत्रित करण्यात आले यामध्ये सहा लोकांचं शिष्टमंडळ व्यवस्थापना सोबत चर्चा करण्यासाठी गेले असता दरम्यान झालेली चर्चा फोन ठरल्यामुळे व शिवाय कंपनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून चालढकलपणाची उत्तरे मिळाल्यामुळे सरपंच संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी पावले उचलली जात आहे आता मात्र आंदोलन स्थगित करण्यासाठी जिल्हा प्रशासन काय भूमिका घेईल याकडे सर्व दहा गावातील नागरिकांचे तसेच आता जिल्हा वाशी यांचे लक्ष लागलेले आहे. 

         वर्षाअंती सिमेंट कारखान्याला हजारो करोडो रुपयाचा नफा होतो, ज्यापैकी केवळ दोन टक्के एवढा वाटा कारखान्याच्या परिसरातील दत्तक गावाच्या विकासावरती खर्च करायचा असतो. खनिज विकास निधीचा विनियोग पालकमंत्री आणि नियोजन समितीच्या निर्देशानुसार करायचा असतो. मात्र अल्ट्राटेक सिमेंट कारखान्याच्या माध्यमातून हा निधी देण्याकरिता टाळाटाळ आणि जाणून बुजून दिरंगाई केली जाते. यामुळे त्यांच्या अन्यायकारक धोरणाला कंटाळून दहा गावातील सरपंच पक्षपातीपणा बाजूला ठेवून एकत्रित आलेले असून आता मात्र कंपनी व्यवस्थापनाला वटणीवर आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. निर्वाचन क्षेत्राचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी व सर्व वरिष्ठ अधिकारी वर्गांनी यामध्ये प्रामुख्याने लक्ष घालून गावकऱ्यांच्या मागण्या पदरी पाडून द्याव्या अन्यथा उपोषण मंडपातच प्राण गेला तरी चालेल मात्र कोणत्याही वैद्यकीय सेवा आम्ही घेणार नाही हा कंपनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा आहे 
- उपोषणकर्ता रत्नाकर चटप 
जिल्हा सचिव, अखिल भारतीय सरपंच परिषद आणि ग्रा पं सदस्य नांदा
(gadchandur) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top