Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सुजा खोब्रागडे ची एम्स मध्ये नर्सिंग आफिसर पदी नियुक्ती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ॲड.वामनराव चटप यांनी चिंचोली गावात जाऊन केला सत्कार आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. 05 नोव्हेंबर 2023) -         नागपूूर येथील एम्स या ...

ॲड.वामनराव चटप यांनी चिंचोली गावात जाऊन केला सत्कार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 05 नोव्हेंबर 2023) -
        नागपूूर येथील एम्स या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विभागात स्पर्धा परिक्षेत नर्सिंग ऑफिसर म्हणून निवड झालेल्या कु.सुजा सुरेश खोब्रागडे हीचा शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांनी चिंचोली (बु.) या तिच्या गावी जाऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार केला. 

        कु.सुजा सुरेश खोब्रागडे हीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिंचोली (बु.) आणि सुबई आश्रमशाळेत झाले. त्यानंतर साडेतिन वर्ष आर.जी.एन.एम. नर्सिंग आणि त्यानंतर दोन वर्षाचा पोष्ट बेसिक बिएससी नर्सिंग अभ्यासक्रम प्राविण्य मिळवित पुर्ण केला. यानंतर तिने महाराष्ट्र राज्याची कम्युनिटी नर्सिंग ऑफिसर या स्पर्धा परिक्षेत राज्यातून आठवा क्रमांक मिळाला. त्यानंतर डी.एम.ई.आर. (वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय) या स्पर्धा परिक्षेत महाराष्ट्र पातळीवर 441 वा क्रमांक मिळविला. आणि आत्ता ऑक्टोंबर 2023 मधे झालेल्या एम्स च्या स्पर्धा परीक्षेत देश पातळीवर 628 वा क्रमांक मिळवला. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असतांना सुजाने योग्य नियोजन व कठोर परिश्रम संघर्ष करीत हे यश प्राप्त केले, याबद्दल माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांनी तिचे कौतूक करून शुभेच्छा दिल्या. सुजाने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील आणि गुरूजनांना दिले आहे.

        यावेळी बाजार समिती माजी सभापती प्रभाकर ढवस, माजी नगरसेवक मधुकर चिंचोलकर, इंजिनिअर स्वप्निल पहानपटे, सरपंंच पिलाजी पाटील भोंगळे, चरणदास बोटरे, उपसरपंच पुष्पा धनवलकर, फादर अनुप, शंकर धनवलकर, सत्कारमुर्तीचे वडील सुरेश राजाराम खोब्रागडे व आई शामला खोब्रागडे, संतोष नेव्हारे, विद्या डाहूले, दयानंद तावाडे, सुभाष धनवलकर, नथ्थु हजारे, भगीरथ उमरे, गोपाल डाहुले, रवि खोब्रागड़े, शीतल खोब्रागडे, पुष्पा वासेकर, उषा धनवलकर यांचेसह गावकरी उपस्थित होते. (rajura) (aamcha vidarbha)


Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top