Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: प्रचंड मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली - डॉ. लीना येवले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. ५ नोव्हेंबर २०२३) -          जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बदल करून प्रचंड मेहनत आणि सकारात्मक व...

आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ५ नोव्हेंबर २०२३) - 
        जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बदल करून प्रचंड मेहनत आणि सकारात्मक विचार हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन डॉ. लीना विठ्ठलराव येवले यांनी केले.

        धनगर जमात सेवा मंडळ राजुरा यांनी कोजागिरी कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुंडलीक उराडे होते. यावेळी डॉ. लीना यांचा महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच चंद्रपूर जिल्हा शाखेने सत्कार केला त्यावेळी त्यांनी मनोगतातून आपल्या भावना आणि अभ्यास यावर विचार व्यक्त केले. धनगर जमातीचे अनुसूचित जमातीचे घटनात्मक आरक्षण यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुरू आहे यावर प्रबोधन मंच चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष कैलास उराडे यांनी सविस्तर माहिती दिली. मुलांचे शिक्षण आणि पालकांची भूमिका यावर शिक्षक नेते संजय चिडे यांनी उद्बोधन केले. अपयश सोडून यशाचा आलेख चढता कसा होईल यात महिलांनी विशेष भूमिका बजावली पाहिजे याकडे केंद्रप्रमुख संध्या ढवळे यांनी लक्ष वेधले. ग्रामसेविका हिंजे मॅडम यांनी धनगरांसाठी असलेल्या शासकीय योजना यावर माहिती दिली. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी अध्यक्ष भाऊराव खाडे, सरोजताई तेलंग उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष गोपाळ बुरांडे यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा धवणे यांनी तर सर्वांचे आभार रामकिसन चिडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळू कापडे, ईश्वर बुचे, विठोबा तेलंग, द्रौपदी पोतले,सचिन झाडे, दिनेश पोतले, अनंता गोखरें, प्रणाली तुराळे, वनिता उराडे,बेबी पोतले यांनी परिश्रम घेतले. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top