Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पुढच्या पिढीला पर्यावरणपूरक सामाजिक समरसतेचे दर्शन घडविणासाठी घुसाडी उत्सव महत्वपूर्ण - देवराव भोंगळे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
घानागुडा येथील घुसाडी उत्सवास देवराव भोंगळे यांची सदिच्छा भेट आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १५ नोव्हेंबर २०२३) -          निसर्गाला स...

घानागुडा येथील घुसाडी उत्सवास देवराव भोंगळे यांची सदिच्छा भेट
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १५ नोव्हेंबर २०२३) -
         निसर्गाला सर्वोच्च शक्ती मानून पर्यावरण पुरक पारंपरिक दिवाळी साजरी करणाऱ्या आदिवासी समाजाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राजुरा विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे यांनी तालुक्यातील घानागुडा (पाचगांव) येथे सदिच्छा भेट दिली. आदिवासी समुहातील गोंड जमातीच्या माध्यमातून दरवर्षी परंपरागत दिवाळीच्या दहा दिवसांत साजऱ्या होणाऱ्या या घुसाडी व दंडारी नृत्यात सहभागी होऊन जमलेल्या आदिवासी बांधवांना त्यांनी यानिमित्तानं दिवाळीच्या शुभेच्छा ही दिल्या.

         गोंड समाजात दिवाळी सणाचे वेगळे महत्त्व आहे. या समाजात दिवाळी पर्व हे ८ ते१० दिवसाचे असते. गावातील आबालवृद्ध सामुहिकरीत्या एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात. संस्कृती व परंपरेनुसार हा सण शेती, गोधन आणि वन औषधींशी निगडीत आहे. दिवाळीचे विशेष आकर्षण असलेल्या डफाच्या तालबद्ध आवाजात घुसाडी नृत्यावर थिरकणारे पाय, तुळंब व हलगी वाद्यावरील लयबद्ध टिपरी-दंडारी नृत्य हे अधिकच लोभसवाणे वाटते. कुठेही फटाक्यांची आतिषबाजी नाही, प्रदुषणमुक्त आणि निसर्गयुक्त अशा पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवाळीचा आनंद घेण्याची ही प्रथा पुर्वापार चालत आलेली आहे. या माध्यमातून पर्यावरण पुरक संदेश, संस्कृतीचे रक्षण, स्त्री-पुरूष समानता व सामाजिक समरसतेचे दर्शन पुढच्या पिढीला होत असते. हे निश्चितचं महत्वाचे आहे. असे प्रतिपादन याठिकाणी बोलताना देवराव भोंगळे यांनी आपल्या मनोगतातून केले. 

         या कार्यक्रमाला, माजी पं.स. सदस्या सुनंदा डोंगे, संजय जयपुरकर, घानागुडाचे गावपाटिल भिमराव कुमरे, गंगु कुमरे, चिन्नू कुमरे, ग्रा.प.सदस्य बापुराव मडावी, हिरामण कुमरे, तं.मु.स.चे माजी अध्यक्ष लक्ष्मण नुलावार, सालेगुडा (सोनापुर) येथिल घुसाडी नृत्य प्रमुख मोतीराम कुमरे, महादु आत्राम, जैराम कोटनाके, देवराव कोटनाके, भगवान कुमरे,मोजू आत्राम, मोतीराम कोटनाके, घानागुडा येथील लालशाव कुमरे, सिंगटराव रायसिडाम, महादेव किन्नाके, लक्ष्मण कुमरे, गोविंदा कुमरे, रामशाव तोडासे, निखिल कुमरे, देवराव आत्राम, लिंबाराव कुमरे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती. (gadchandur) (rajura) (amcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top