Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सिमेंट कंपनी विरोधात सरपंच संघटना उद्यापासून करणार आमरण उपोषण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तीन दिवसांचा दिला होता इशारा कांग्रेस पक्षातील एकही मोठ्या नेत्यानी अजून पर्यंत उपोषण स्थळाला भेट नाही दिल्याने स्थानीय नागरिकांत आश्चर्श..?...

तीन दिवसांचा दिला होता इशारा
कांग्रेस पक्षातील एकही मोठ्या नेत्यानी अजून पर्यंत उपोषण स्थळाला भेट नाही दिल्याने स्थानीय नागरिकांत आश्चर्श..??
'मी माझ्या गावासाठी' गावकऱ्यांच्या हातात फलक
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. १५ नोव्हेंबर २०२३) -
        अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर यांच्या विरोधात दत्तक ग्राम सरपंच संघटनेच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे साखळी उपोषण सुरू असून आंदोलनाची योग्य दखल घेतली न गेल्याने उद्यापासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे सरपंच संघटनेने जाहीर केले आहे. त्यामुळे कंपनीसमोर आणखी मोठे आव्हान उभे होणार आहे. (Ultratech Cement Awarpur)

        दत्तक गावांतील सीएसआर निधी वाटपांतर्गत तिढा सोडवण्यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी ४० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंच संघटना कंपनीविरोधात साखळी उपोषणासाठी बसली आहे. आतापर्यंत, शेतकरी संघटनेचे लोकप्रिय नेता माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजपाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगडे, राकाँ चे आबिद अली, सतीश धोटे, संजय मुसडे, प्रा. अनिल मुसडे, युवा नेता निलेश ताजने, एड. दीपक चटप,  सहीत अनेक विविध राजकीय पक्षासह व्यापारी असोसिएशन, विविध सामाजिक संघटना व पत्रकार संघांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

        दत्तक गावातील नागरिकांनी 'मी माझ्या गावासोबत' अशा प्रकारची फलके दाखवून सरपंच आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तीन दिवस उलटून गेले तरी कंपनीच्या कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याने आतापर्यंत आंदोलनाच्या ठिकाणी येऊन भेट देऊन चर्चा न केल्याने सरपंच संघटनेने तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सरपंच संघटनेच्या आंदोलनाला दत्तक गावातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून आंदोलनाने विशाल स्वरूप घेतले आहे.

        उद्या (दि. १६) पासून होणाऱ्या आमरण उपोषणास गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन सहभाग घ्यावा असे आवाहन दत्तक ग्राम सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. स्थानीय लोकहिताच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या या  विरोध आंदोलन आणि साखळी उपोषणाला भाजपा, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी कांग्रेस सहीत अनेक राजकीय दलानी या पाठिंबा दिला असला तरी काँग्रेसचे स्थानीय आमदार सुभाष धोटे सहीत कांग्रेस पक्षातील एकही मोठ्या नेत्यानी अजून पर्यंत उपोषण स्थळाला भेट नाही दिल्याने स्थानीय नागरिक आश्चर्श व्यक्त करीत आहे. (gadchandur) (korpana) (amcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top