Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: केंद्र सरकारच्या महिला विरोधी धोरणांच्या निषेधार्थ राजुरा महिला काँग्रेसचा सत्याग्रह मार्च
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. ७ (ऑक्टॉबर २०२३) -         मणिपूर येथील मानवतेला काळीमा फासणारी घटना, महिला कुस्ती खेळाडूंवरील अ...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ७ (ऑक्टॉबर २०२३) -
        मणिपूर येथील मानवतेला काळीमा फासणारी घटना, महिला कुस्ती खेळाडूंवरील अत्याचार, महिलांवरील वाढते दुराचार, महिला आरक्षणाच्या अमलबजावणीसाठी सरकार कडून होणारा विलंब, वाढती महागाई, बेरोजगारी अशा अनेक प्रश्नांना घेऊन राजुरा तालुका व शहर महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साप्ताहाचे औचित्य साधून संविधान चौक ते गांधी चौक राजुरा पर्यंत शांततामय मार्गाने पैदल सत्याग्रह मार्च काढून, हातात जनजागृतीपर संदेश असणारे फलक घेऊन भाजप सरकारच्या महिला विरोधी धोरणांबाबत निषेधात्मक आंदोलन करण्यात आले, जनजागृती करण्यात आली. गांधी भवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून महिलांनी सत्याग्रह मार्च पुर्ण केला. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेटा डिसूजा, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या निर्देशानुसार हा सत्याग्रह मार्च काढण्यात आला. 

        या प्रसंगी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा निर्मला कुळमेथे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, इंदुताई निकोडे, कामिना उईके, कविता उपरे, अर्चना चन्नावार, अर्चना गर्गेलवार, नंदा गेडाम, दीपा करमणकर, पुनम गिरसावडे, निता बानकर, भावना मडावी, पुष्पा ढोले, शुभांगी गोणेलवार, नमिता भटारकर, पार्वताबाई तलांडे, पंचफुला सातपुते, कमलाबाई दानपल्लीवार, शारदा उईके, जिजाबाई शेडमाके, कमलाबाई मारमुकवार, वर्षा रेकोनवार, शोभा वसाके, भावना मोहुर्ले, माया रागीट, संगीता भटारकर, प्रभा रागीट यासह महिला तालुका व शहर काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. (aamcha vidarbha) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top