Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २५ ऑक्टॉबर २०२३) -         राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजुरा नगराचा विजयादशमी उत्सव स्थानिक हनुमान मं...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २५ ऑक्टॉबर २०२३) -
        राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजुरा नगराचा विजयादशमी उत्सव स्थानिक हनुमान मंदिराच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून संस्कार भारतीचे अखिल भारतीय संयोजक आशुतोष अडोणी व रा. स्व संघाचे तालुका संघचालक राजेंद्र येणुगवार, राजुरा नगर कार्यवाह महेश समर्थ उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी मुख्य संघस्थानापासून आझाद चौक नेहरू चौक आंबेडकर वार्ड मार्गाने कार्यक्रम स्थळापर्यंत स्वयंसेवकांचे पथसंचालन संपन्न झाले. ह्यावेळी स्वयंसेवकांचे योगव्यायाम व दंड प्रात्यक्षिक उपस्थितांचे समोर प्रदर्शन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मुख्य वक्ते आशुतोष अडोनी यांनी विजयादशमीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेत असणारे महत्व विशद केले, 1925 साली विजयादशमीच्या दिवशी पूजनीय सरसंघचालक डॉक्टर हेडगेवारांनी संघस्थापणेच्या वेळी ज्या विचारांनी प्रेरित होऊन संघाची स्थापना केली त्या विचाराचे संगोपन करण्यासाठी अखंड प्रयत्नरत राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. हिंदुधर्म हा केवळ धर्म नसून ती एक संस्कृती आहे व मागील जवळपास शंभर वर्षे संघशक्तीला विरोध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्ती आपल्या प्रयत्नात अयशस्वी झाल्याने आता या संस्कृतीवर आघात करून आपली शक्ती कमजोर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याने हिंदू शक्तीने आता सतर्क राहण्याची गरज असून सर्व शक्तीने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे असून त्याकरीता संघ व संघ विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी स्वयंसेवकांसह संघप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top