Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अवैध दारूविक्री शेकडो महिला धडकल्या राजुरा पोलीस ठाण्यावर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पांढरपौनीत अवैध दारूविक्री विरुद्ध महिला आक्रमक दिला तीव्र आंदोलनाचा इशारा आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. ४ ऑक्टॉबर २०२३) -    ...

पांढरपौनीत अवैध दारूविक्री विरुद्ध महिला आक्रमक
दिला तीव्र आंदोलनाचा इशारा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ४ ऑक्टॉबर २०२३) -
        राजुरा तालुक्यातील मौजा पांढरपौनी आणि परिसरात अवैध रित्या दारू विक्री चालू असून वारंवार ग्रामपंचायतीला महिलांची आणि युवकांची तक्रार येत आहे. याबाबत अनेकदा पोलीस विभाग, एक्साईज विभागास तोंडी सुचना देऊनही प्रभावी कारवाई न झाल्याने गावात सर्रासपणे अवैध दारू विक्री सुरू आहे. यामुळे गावात तणावाचे वातावरण असून अनेकांचे संसार उध्वस्थ होत आहे. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करून गावात सुखशांतीचे वातावरण टिकून राहावे यासाठी मदत करावी अशी मागणी घेऊन ग्रामपंचायत पांढरपौवणी आणि गावातील शेकडोंच्या संख्येने महिलाशक्ती ने थेट राजुरा गाठून राजुरा पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदनाद्वारे गावातील अवैध दारू पुर्णपणे बंद करण्याची मागणी केली. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. एवढ्या मोठ्या संख्येने महिलांचा मार्च रस्त्यावर पाहून राजुरा शहरातील नागरिकांमध्ये उत्सुकता बघायला मिळत होती. तसेच गावात महिलांनी भव्य दिव्य रॅली काढून जनजागृती करीत राजुरा गाठले हे विशेष. (Women aggressive against illegal liquor sale in Pandharpauni Gave warning of intense agitation)

        या प्रसंगी पांढरपौनीच्या सरपंच मंदाताई आत्राम, उपसरपंच सुधीर लांडे, ग्रा. प. सदस्य दिवाकर मोरे, मनोहर पेंदोर, देवराव आत्राम, ताईबाई वैरागडे, सुगंधाबाई मेश्राम, पार्वताबाई सोयाम सविता आत्राम, प्रीती उमरे, तमुस अध्यक्ष आनंदराव वैरागडे, जेष्ठ नागरिक शंभर घोटेकर, श्यामराव येलगुले, मारोती निब्रड, वसंता वैरागडे, परशुराम रोगे, एकनाथ धोटे, भाऊराव बोबडे यासह शेकडोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top