Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दुर्धर आजाराने त्रस्त नामदेवाच्या मदतीला धावले "देव" राव
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिवती येथील रुग्णाचा नागपूर येथे उपचार सुधीर भाऊ सेवा केंद्रातून मिळाली तातडीची मदत आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. ४ ऑक्टॉबर २०...

जिवती येथील रुग्णाचा नागपूर येथे उपचार
सुधीर भाऊ सेवा केंद्रातून मिळाली तातडीची मदत
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ४ ऑक्टॉबर २०२३) -
        सध्या राज्यातील मोठ्या प्रमाणात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून राजुरा विधानसभा क्षेत्रातील अतिदुर्गम, आदिवासी, मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्या अंतर्गत येत असलेल्या सेवदासनगर येथील तीस वर्षीय प्रविण नामदेव पवार या युवकाला यकृत आणि मूत्रपिंडाच्या दुर्धर आजाराने ग्रासल्यामुळे त्रस्त होता. आपल्या आजारावर योग्य उपचार मिळावा यासाठी आज (दि. ४) बुधवारला राजुरा येथिल सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र कार्यालयात येऊन विचारणा केली असता यावेळी उपस्थित राजुरा विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे (deorav bhongale) यांना भेटून त्यांनी आपली आपबिती सांगितली. यावेळी क्षणाचाही विलंब न करता नामदेव यांच्या मदतीला "देव" राव धावून येत रुग्णवाहिका उपलब्ध करून त्यांना नागपूर येथे योग्य उपचाराकरिता पाठविण्यात आले. (Patient from Jivati ​​treated at Nagpur) (Urgent help received from Sudhir Bhau Seva Kendra)

        नामदेव पवार हे मागील काही दिवसांपासून यकृत आणि मूत्रपिंडाच्या दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्यांना योग्य उपचार मिळत नसल्याने ते इतरत्र फिरत होते. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र राजुरा (sudhirbhau mungantiwar seva kendra rajura) या ठिकाणी आजारावरील योग्य उपचारासाठी मदत मिळतील या आशेने राजुरा येथील सेवा केंद्रात आले. सेवा केंद्रातील उपस्थितांना सबंधित आजारावरील उपचारासाबंधी माहिती घेत असताना भाजपा राजुरा विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली असता नामदेव यांनी आपल्या आजारासाबंधी माहिती सांगितली. या आजारावर योग्य उपचार करण्यासाठी त्यांना नागपूर येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जाण्यास सांगितले व तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देत त्यांना नागपूर येथे पाठविले. यावेळी आजाराने त्रस्त रुग्णांनी नामदेवाला देव भेटल्याची भावना व्यक्त केली. याप्रसंगी त्यांचे आप्त, भुरकुंडाचे उपसरपंच अजय राठोड, दिपक झाडे आदिंची उपस्थिती होती. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top