Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: तीर्थस्थळ कालेश्वरला दर्शनासाठी गेलेले दोन युवक गोदावरीत बुडाले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सतर्कतेमुळे तिघेजण बचावले आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स सिरोंचा (दि. १४ ऑगस्ट २०२३) -         गोदावरी नदी तीरावरील कालेश्वर तीर्थस्थळावर दर...
सतर्कतेमुळे तिघेजण बचावले
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
सिरोंचा (दि. १४ ऑगस्ट २०२३) -
        गोदावरी नदी तीरावरील कालेश्वर तीर्थस्थळावर दर्शन घेण्यासाठी गेलेले युवक नदीत आंघोळ करताना खोल पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सोबतच्या युवकांनी केला; परंतु त्यांना यश आले नाही. नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार १३ ऑगस्ट रोजी दुपारी सिरोंचा नजीकच्या गोदावरी नदीत घडली. हिमांशू अरुण मून (२०) रा. नागपूर, सुमन राजू मानशेट्टी (१७) रा. आसरअल्ली ता. सिरोंचा अशी मृतकांची नावे आहेत. सुमन मानशेट्टी हा इयत्ता नववीत शिकत होता. तर नगरम येथील कार्तिक पडाल (१९) नवीन पडाली (२१) व रंजीत पडाल (२०) आदी तिघांना बुडण्यापासून वाचवण्यात यश आले. गोदावरी नदीत युवक बुडाल्यानंतर स्थानिक मासेमार, पोलिस व एसडीआरएफच्या पथकाद्वारा शोधमोहीम राबवून सायंकाळी ५:३० वाजतापर्यंत त्यांचे शव हस्तगत करण्यात आले. तेलंगणा राज्यातील कालेश्वर येथील देवस्थानात दर्शन घेण्यासाठी रविवारी सकाळी हे युवक गेले होते.

        सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सिरोंचा पोलिस व एसडीआरएफच्या चमूने घटनास्थळी धाव घेऊन मासेमारांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. सायंकाळी ५:३० वाजता युवकांचे मृतदेह सापडले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. सदर घटनेचा अधिक तपास सिरोंचा पोलिस करीत आहेत.

पोहता येत नसल्याने झाला घात
        कालेश्वर येथे दर्शन घेण्याकरिता जाण्यापूर्वी आंघोळीसाठी युवक सिरोंचा तालुक्याच्या हद्दीतील गोदावरी नदी पात्रात उतरले. यापैकी एक-दोन युवकांना पोहता येत नव्हते. आंघोळ करताना मित्रांसोबत ते खोल पाण्यात गेले. यापैकी हिमांशू मून व सुमन मानशेट्टी हे अतिखोलात गेल्याने ते बुडाले. इतर लोकांनी वाचविण्याचा प्रयत्न केले पण अपयशी ठरले. (Sironcha) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top