Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अपघातग्रस्त वैद्य कुटुंबीयांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वेकोलि बल्लारपूर क्षेत्र प्रशासना विरोधात रास्ता रोको आंदोलन काल सास्ती-राजुरा मार्गावर झाला होता भीषण अपघात आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे...
वेकोलि बल्लारपूर क्षेत्र प्रशासना विरोधात रास्ता रोको आंदोलन
काल सास्ती-राजुरा मार्गावर झाला होता भीषण अपघात
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १४ ऑगस्ट २०२३) -
        रविवार दि. 13 ऑगस्ट 2023 रोजी ट्रक क्र. MH-34 AB-7964 ने दोन दुचाकींना जबर धडक देत पळ काढला होता. ट्रकने अगोदर धोपटाला टाऊनशिप गेट जवळ एका दुचाकी वाहनाला धडक दिली त्यात दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले. त्या ट्रकने सुसाट वेगाने पळ काढत थोड्या समोर जाऊन धोपटाला गावाजवळील जव्हेरी पेट्रोल पंपाजवळ पुन्हा एका दुचाकी ला जबर धडक दिली या धडकेत गुरुदेव नगर धोपटाला येथील रहिवासी हे आपल्या मोपेड एक्टिवा क्र. MH-34 AU-2704 ने चंद्रपूरहुन सास्ती मार्गे येत असताना निलेश वैद्य 30, पत्नी रूपाली वय 28 व दोन वर्षाची चिमुरडी मधू यांच्या जागीच मृत्यू झाला होता. रात्री संतापलेले नागरिक रास्ता रोको करून तीव्र आंदोलन करत मृतदेह उचलू देत नव्हते. संतापलेले नागरिक वेकोलि प्रशासनाकडून आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून नुकसान भरपाईची मागणी करत होते शेवटी रात्री उशिरा वेकोलि कडून एक लाख आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून दोन लाखाची रक्कम मंजूर झाल्यानंतर मृतदेह उचलण्यात आले. पोलिसांनी ट्रक चालक दुखनपाल कैथल याला अटकेत घेत त्याविरुद्ध भादंवि 279, 304, 338 मोटारवाहन अधिनियम 184 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून समोरील तपास सुरु आहे. (Rasta Roko Andolan against Vekoli Ballarpur Area Administration) (accident)

        आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान मृतकांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर धोपटाळा येथील नागरिकांनी वेकोली मुख्य महाप्रबंधक कार्यालयासमोर घेराव करत रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली. नागरिकांनी वेकोलिकडून मृतक कुटुंबियांच्या वारसदारांना मदत, सास्ती-रामपूर मार्गावर जड वाहनांना बंदी,रस्त्याचे चौपदरीकरण, रस्त्यावर पथदिवे तसेच ट्रक चालक-मालक व सहयोगी कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. घेराव आंदोलन जवळपास चार तास सुरु होते. त्यानंतर एका शिष्टमंडळाने वेकोलिचे GM (संचालन) विनोदकुमार नामदेव, APM  सीव्हीएस रामानुजम, गोवरी सब एरियाचे उपक्षेत्रीय व्यवस्थापक जीव्हीएस प्रसाद यांचेशी चर्चा केली. घेराव आंदोलनात प्रामुख्याने धोपटाला येथील सरपंच मैनाबाई नन्नावरे, उपसरपंच राजू पाटील, बीआरएसच्या तालुका महिला समन्वयक रेशमा चौहान, ज्योती नळे, राजू काटम, ग्रामपंचायत सदस्य दीपक झाडे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. परिविक्षाधीन पोलीस निरीक्षक विशाल नागरगोजे, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, पोलीस उपनिरीक्षक धमेंद्र जोशी, ओमप्रकाश गेडाम हे पोलीस ताफ्यासह प्रकरण योग्यरीत्या हाताळत बंदोबस्त करीत होते. (A terrible accident took place on the Sasti-Rajura route) (Police Station Rajura) 

        सास्ती-राजुरा मार्गावरून व गोवरी-रामपूर या मार्गावरून वेकोलिची कोळसा वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. कोळसा वाहतूक करताना ट्रक चालक क्षमतेपेक्षा जास्त कोळसा वाहून नेत असताना अनेकदा ट्रकमधील कोळसा रस्त्यावर पडत असतात यात रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांच्या अंगावर कोळसा पडल्याने अनेकदा छोटे वाहन चालक जखमी झाले आहे. मात्र याकडे ना वेकोलि लक्ष देत आहे ना पोलीस प्रशासन लक्ष देत. यासंबंधीत कारवाही करणारे उपप्रादेशिक परिवहन विभाग सुद्धा या जडवाहणाकडे लक्ष न देत फक्त हेल्मेटपूर्ती कारवाई करीत असल्याने ट्रान्सपोर्ट व ट्रक वाहन चालक बिन्धास्त असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भरधाव वेगाने वाहन चालत असल्याने या मार्गावर अनेक अपघात झाले आहे. (aamcha vidarbha) 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top