Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नगरपरिषद द्वारे आयोजित मोफत आरोग्य शिबिरात ३७४ लाभार्थ्यांची तपासणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते पार पडले शिबिराचे उद्घाटन आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. 8 ऑगस्ट 2023) -         नगर पर...

माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते पार पडले शिबिराचे उद्घाटन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. 8 ऑगस्ट 2023) -
        नगर परिषद राजुरा व  टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमानाने राजुरातील नागरिकाकरिता दिनांक 7 ऑगस्ट 2023 ला नगरपरिषदेचे सुपर मार्केट मॅरेज हाल राजुरा येथे सकाळी १० वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या शुभहस्ते पार पडले. प्रमुख उपस्थिती माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे होते, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव यांनी केले तर शिबिराबद्दल मार्गदर्शन डॉक्टर आशिष बारबदे फिजिशियन यांनी केले. (Former Mayor Arun Dhote inaugurated the camp)

        या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात रक्तदाब, शुगर, कॅन्सर, मुखाचा, स्तनाचा गर्भाशयाचा इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. तसेच डोळे तपासणी व इतर विविध आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या. ह्या शिबिरात 374 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे, ह्या तपासणीत डॉक्टर अडवाणी, डॉक्टर प्रदीप मंडल, डॉक्टर आशिष बारबदे, डॉक्टर ट्विंकल डेंगळे, डॉक्टर अक्षय चव्हाण व सुरज साळुंखे तसेच त्यांची टीमचे सर्व सहकारी यांनी आरोग्य तपासणी करत सहकार्य केले. 

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नपचे प्रशासकीय अधिकारी विजयकुमार जांभुळकर, आभार पाणीपुरवठा अभियंता सुमित खापर्डे यांनी मानले. आरोग्य तपासणी शिबिराच्या यशस्वितेकरिता आरोग्य विभागाची टीम, मिळकत व्यवस्थापक अक्षय सूर्यवंशी, विद्युत अभियंता आदित्य खापणे, इंजिनियर प्रीतम खडसे, कर निरीक्षक उपेंद्र धामणगे, लेखापाल अश्विन भोई, सुरेखा पटेल, प्रांजली सरपटवार, प्रज्ञा धोटे व महिला बचत गटांच्या महिलांनी परिश्रम घेतले. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top