Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महाराजा ट्रॅव्हल्सची उभ्या टँकर ला धडक - एकाचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बरबटी गावाजवळ झाला भीषण अपघात पालगाव-राजुरा-बल्लारपूर-चंद्रपूर मार्गे नागपूरला जात होती ट्रॅव्हल्स बघा व्हिडीओ - वाचा सविस्तर माहिती आमचा वि...
बरबटी गावाजवळ झाला भीषण अपघात
पालगाव-राजुरा-बल्लारपूर-चंद्रपूर मार्गे नागपूरला जात होती ट्रॅव्हल्स
बघा व्हिडीओ - वाचा सविस्तर माहिती
आमचा विदर्भ - ब्युरो दीपक शर्मा द्वारे
नागपूर (दि. 20 ऑगस्ट 2023) -
        पालगाव-राजुरा-बल्लारपूर-चंद्रपूर मार्गे नागपूरला जाणाऱ्या महाराजा ट्रॅव्हल्सच्या समोरील टँकरला ओव्हरटेक करण्याच्या नादात भीषण अपघात झाला. या अपघातात एक जणांचा मृत्यू झाला असून जवळपास आठ ते दहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. हा अपघात सकाळी सुमारे 10.30 वाजताच्या सुमारास बरबटी गावाजवळ झाला. (A terrible accident took place near Barbati village) (nagpur) (Maharaja Travels)

        बल्लारपूर येथील धीरज कुलकर्णी वय 40 वर्षे असे मृतकाचे नाव असून गंभीर जखमी असलेल्या चार-पाच प्रवाश्याना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (accident)

        अपघाताची माहिती मिळताच जाम पोलीस मदत केंद्र आणि सिंदी रेल्वे पोलिसांनी नोंद घेत जखमींना नागपूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. तर काही किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. 

        MH 34 BZ 0009 क्रमांकाची महाराजा ट्रॅव्हल्स बस पालगावहून व्हाया राजुरा-बल्लारशाह-चंद्रपूर मार्गे नागपूरला जात होती. दरम्यान समोर जात असलेल्या MH 04 FU 2045 क्रमांकाचा टँकरला ओव्हरटेक करत असताना बसने टँकरला मागाहून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका प्रवाश्याच्या मृत्यू व दहा ते बारा प्रवाशी जखमी झाले. (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top