Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत कार्तिक ची निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
इन्फन्ट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा च्या विद्यार्थ्याने बुद्धिबळ स्पर्धेत प्राविण्य मिळवीत शाळेचे नाव उंचविले आमचा विदर्भ - अविनाश रामटेके,...
इन्फन्ट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा च्या विद्यार्थ्याने बुद्धिबळ स्पर्धेत प्राविण्य मिळवीत शाळेचे नाव उंचविले
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके, प्रतिनिधी
विरुर स्टेशन (दि. 22 ऑगस्ट 2023) -
        क्रीडा संचालन पुणे अंतर्गत चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा संकुल राजुरा येथे विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, यामध्ये बुद्धिबळ स्पर्धेत 17 वर्षीय वयोगटात इयता आठव्या वर्गात शिकत असलेला इन्फन्ट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा या शाळेचा कार्तिक अविनाश रामटेके यांनी बुद्धिबळ स्पर्धेत प्राविण्य मिळवीत आपल्या शाळेचे नाव उंचविले आहे. (Infant Jesus English High School Rajura) (Chess tournament)

        त्यामुळे समोर होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कार्तिक याची निवड झाल्याने शाळेचे मुख्याध्यापक रफिक अन्सारी, मंजुषा अलोने, विद्या शेरकी व शिक्षकवृंद आणि पालकांनी याचे अभिनंदन करीत पुढील होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. (aamcha vidarbha) (rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top