आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत द्वारे
गडचांदूर (दि. १९ जुलै २०२३) -
गडचांदुर वासीयांना खड्डेमुक्त रस्ते देण्याच्या उदात्त हेतुने कुभंकर्णी झोपेत असलेल्या नगर परिषद प्रशासनाला काही दिवसांपूर्वी एक निवेदन देऊन खड्डे बुजवण्याची विनंती करत अल्टीमेट देण्यात आले होते. परंतु सदर निवेदना कडे नप अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने भाजपाच्या वतीने रस्त्यात चिखलमय पाणी जमा असताना पाण्याने भरलेल्या खड्यात बसून आगळे वेगळे निषेध आंदोलन करण्यात आले. (Protest movement to draw the attention of city council administratio)
शहरातील अचानक चौक ते शिवाजी चौक ते महात्मा ज्योतिबा फुले व्यापारी संकुल पर्यंतचा गुजरी बाजार व शहरातील मुख्य बाजारपेठ आणी शाळा महाविद्यालयात जाणारा वर्दळीच्या या रस्तावर मागील अनेक महिन्यापासून मोठमोठे खडे पडून पूर्णपणे खड्याने व्यापला आहे. शिवाजी चौकात सौंदरीकरण करून शिवाजी महाराजांच्या किल्याची प्रतिकृति बांधण्यात आली. परंतु त्याच् चौकात संततधार पावसाने पाणी साचल्याने मोठे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच संपूर्ण परिसरात घाण पसरून याचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सांडपाणी गटारतील पाणी रस्त्यावर आल्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भावही वाढण्याची भीती वर्तिलि जात आहे. रस्त्यावरील खड्यामुळे वारंवार छोटे मोठे अपघात होत असल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र नप प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे नागरिकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
शहरात दर मंगलवारला भरणाऱ्या आठवडी बाजारात, खड्डे, चिखल, माती, घाणीचे साम्राज्य पसरून दयनीय अवस्था झाली आहे. बाजारात दुकान लावणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि बाजारात येणाऱ्या महिला, ग्राहकांना चिखलातुन वाट काढून नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आठवडी बाजाराचा चौदा लाख रुपये किमतीचा लिलाव करून उत्त्पन्न मिळविणाऱ्या गडचांदूर नागरपरिषद ने आठवडी बाजाराची मात्र दयनीय अवस्था करून ठेवली आहे. शेवटी जेव्हा जेव्हा अन्याय सहन करण्याची क्षमता संपते, तेव्हा तेव्हा क्रांती होत असते हे सत्ताधार्यांना दाखविने गरजेचे असल्याने दि. १८ जुलै रोजी मुख्य मार्गावर चिखल आणि पाणी भरलेल्या खड्ड्यात बसुन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने भा.ज.पा.यु.मो तालुका अध्यक्ष रोहन काकडे (Rohan Kakde) यांच्या नेतृत्वाखाली आदोलन करण्यात आले. या आंदोलनाला लोकांचे भरपूर मिळत असल्याने आदोलनांची दखल घेत नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तात्काळ आंदोलन स्थळी येऊन समस्या जाणून घेतल्या व तात्काळ रस्त्याची डागडुजी करण्याचे आश्वासन दिले. हे खड्डे लवकरात लवकर न बुजविल्यास नगर परिषदेच्या विरोधात व्यापक आंदोलन करण्याचा ईशारा आंदोलन करत्यांनी यावेळी दिला. यावेळी भाजयुमो तालुका अध्यक्ष रोहन काकडे, भाजपा शहर अध्यक्ष सतीश उपलेंचवार, युवा नेते निलेश ताजने (Nilesh Tajane), संजय ढेपे, अजीम बेग, प्रतिक सदनपवार, पंकज इटनकर, सुयोग कोंगरे, कुणाल पारखी, इमरान पाशा यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते . (gadchandur) (chandrapur) (aamcha vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.