Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भारत राष्ट्र समितीची सुब्बई-विरूर येथे पक्ष प्रवेश सभा संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १९ जुलै २०२३) -         भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtra Samiti) राजुरा विधानसभा क्षेत्र (Raju...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १९ जुलै २०२३) -
        भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtra Samiti) राजुरा विधानसभा क्षेत्र (Rajura Assembly Constituency) जि चंद्रपुर चे राजुरा तालुक्यातील चुनाळा-विरूर जिप क्षेत्रातील (Chunala-Virur zp area) विरूर-सुब्ब्ई पंस गटातील भारत राष्ट्र समिती चे प्रचार, पक्ष प्रवेश सभा राजुरा विधान सभाक्षेत्र समन्वयक आनंदराव वाय. अंगलवार (Anandrao Y. Angalwar) यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा महिला समन्वयक रेशमाताई चव्हाण, राजुरा तालुका समन्वयक अजय सकिनाला, राजुरा तालुका महिला समन्वयक ज्योती नळे, मिनाक्षी मुन, अनसुर्या नुत्थी, भास्कर घोडमारे किसान समन्वयक चिंचोली, प्रकाश चापले यांच्या उपस्थितीत पंचायत समिती स्तरीय सभा संपन्न झाली. 

        अध्यक्षीय मार्गदर्शनातून राजुरा विधान सभाक्षेत्र समन्वयक आनंदराव वाय. अंगलवार यानी व ईतर समन्वयकांनी भारत राष्ट्र समिती द्वारे तेलंगणातील मुख्यमंत्री के.सी.आर. (KCR) यांनी तेलंगाणात राबवित असलेले लोकाभिमुख योजना बद्दल माहीती दिली व भविष्यात महाराष्ट्रात सत्तेत भागीदारी झाले असता सदर सर्व योजना महाराष्ट्रात लागु करणयासाठी दबाव तंत्र निर्माण करणयाचे सांगून जनतेने भारत राष्ट्र समिती चे गुलाबी वादळाला मतदान करून बि.आर.एस. ची  ताकद वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. (Telangana)

        या प्रसंगी वेनू गूंडेटी, चिरंजीवी चिलका, चेराजेश्वर झाडे, शंकर झाडे, संतोष  उपरे, पाला, विलास लखमापुरे, जनार्धन पुप्पलवार, रामदास निब्रड, संजय राठोड, अनिकेत गोरे इत्यादी उपस्थित होते. यावेळी सुब्बई-विरूर पंचायत समीती गट समन्वयक ठरवून कमेटी गठीत करण्यात आली. गटातील सर्व गावाचे ग्राम कमिटी स्थापना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. (rajura)

        सभेत विविध पक्षातील जवळपास शेकडो कार्यकर्त्यांनी आनंदराव वाय अंगलवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश केला. यावेळी प्रवेश घेणाऱ्यांचे गुलाबी दुपट्टे गळ्यात घालून प्रवेश करवून घेण्यात आला. संचालन राजेश/बबलू झाडे तर आभार वेनू गूंडेटी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता रवि वरवाडे, देवा वरवाडे यांनी परिश्रम घेतले. (chandrapur) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top