Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी जाहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर (दि. १९ जुलै २०२३) -         मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आदेशाने...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. १९ जुलै २०२३) -
        मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आदेशाने शिवसेना सचिव संजय मोरे, खासदार प्रतापराव जाधव, यांचे मुख्य उपस्थितीत किरण पांडव (Kiran Pandav) यांचे सूचनेनुसार व चंद्रपूर जिल्हा सहसंपर्क प्रमुख बंडू हजारे (Bandu Hazare), शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते (Nitin Matte), महिला आघाडी जिल्हाप्रमुख योगिताताई लांडगे, युवासेना जिल्हाप्रमुख सूर्या अडबाले यांचे विनंतीवरून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र उपजिल्हा प्रमुखपदी डॉक्टर सागर माकोडे, भद्रावती शिवसेना तालुका प्रमुख पदी कमलकांत कळसकर तर राजेश डांगे यांची वरोरा शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. डॉक्टर सागर माकोडे यांचा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रा मध्ये दांडगा जनसंपर्क असून त्यांच्या जनसंपर्काचा फायदा शिवसेनेला विधानसभा क्षेत्रामध्ये पक्षवाढी संदर्भात निश्चितच होईल तसेच कमलकांत कळस्कर हे ग्रामपंचायतचे माजी सदस्य असून शिवसेनेचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांचा भद्रावती तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात दांडगा जनसंपर्क असून त्यांच्या माध्यमातून भद्रावती तालुका व शहर मध्ये पक्ष वाढ करण्यास विशेष मदत होईल. त्याच प्रमाणे राजेश डांगे हे वरोरा शहरातील केबल नेटवर्क व्यवसायीक असून तथा शिवसैनिक असून ते सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असून वरोरा शहरांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क असून आज राजेश डांगे हे नाव वरोरा शहरात सुपरीचीत आहे त्यांची सुद्धा शिवसेना वाढीसाठी विशेष मदत होईल असा विश्वास नितीन मते जिल्हाप्रमुख यांनी व्यक्त केली. कमलकांत कळस्कर आणि राजेश डांगे यांच्या नियुक्तीने वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसैनिकां मध्ये नव चैतन्य निर्माण झालेले दिसून येत आहे. यावेळी सूर्या अडबाले युवासेना जिल्हाप्रमुख, आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा शहर प्रमुख भद्रावती, श्रीकांत खंगार तालुका प्रमुख वरोरा, नरेन्द्र नरड तालूका प्रमुख ब्रम्हपूरी, अमोल माकोडे शहर प्रमुख ब्रम्हपूरी, सौ ज्योतीताई लांडगे महीला आघाडी तालुका प्रमुख भद्रावती हे उपस्थित होते. (shivsena) (chandrapur) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top