Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिवती तालुक्यातील नवीन रशन कार्ड धारकांना रेशन द्या - शिवसेना तालुका प्रमुख भरत बिरादार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे जिवती (दि. १८ जुलै २०२३) -         मागील एक दोन वर्षांपासून रेशन कार्ड ऑनलाईन झाले असून सुद्धा रेशन कार्ड धा...
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
जिवती (दि. १८ जुलै २०२३) -
        मागील एक दोन वर्षांपासून रेशन कार्ड ऑनलाईन झाले असून सुद्धा रेशन कार्ड धारकांना राशन मिळत नाही आहे. (Ration card holders do not get ration) अनेक राशन कार्ड धारक तहसील कार्यालयात चकरा मारत आहे. अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता अधिकारी कार्ड धारकांना उडवा उडवीचे उत्तर देत असून याबाबत महसूल विभागा प्रति लोकांत रोष निर्माण होत आहे. महाराष्ट्रातील अतिदुर्गम समझले जाणाऱ्या जिवती तालुक्यातील नवीन राशन कार्ड धारकांना महागाईच्या काळात किराणा दुकानातून धान्य घेणे परवडत नसल्याने अश्या लोकांना आर्थिक अडचणीचा व उपासमारीचा सामना करावा लागत आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी तालुक्यातील राशन दुकानदारांना माहिती देऊन नवीन कार्ड धारकांना लवकरात लवकर राशन द्यावे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख भरत बिरादार, तालुका संघटक गणेश पवार, अनिल चव्हाण, प्रफुल चाव्हण उपस्थित होते. (shivsena shinde) (Jiwati) (bharat biradar)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top