Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मानवी जीवनात चैतन्य आणण्याचे कार्य संगीत करते - वंदनाताई चटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्वरप्रीती कला अकादमीचा गुरुपौर्णिमा उत्सव  आरोहीच्या विद्यार्थ्यांंना प्रमाणपत्र वितरण  आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर (दि. ६ जुल...

स्वरप्रीती कला अकादमीचा गुरुपौर्णिमा उत्सव 
आरोहीच्या विद्यार्थ्यांंना प्रमाणपत्र वितरण 
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. ६ जुलै २०२३) -
        संगीत ही मानवी जीवनाला मिळालेली अमूल्य देणगी असून प्रत्येकाच्या जीवनात चैतन्य आणण्याचे कार्य संगीत करते. मानवी जीवनाचा आधार असलेल्या या संगीताची आराधना करण्यासाठी राजुरा शहरात पंचवीस वर्षापूर्वी स्वरप्रीती कला अकादमीची स्थापना करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांंना रीतसर संगीत शिक्षण देऊन त्यांना पारंगत करण्यासाठी आरोही संगीत विद्यालय स्थापून यावर्षी प्रथम व द्वितीय वर्षाच्या १९ विद्यार्थ्यांपैकी सर्वच उत्तीर्ण झाले, ही बाब राजुरा येथील दिलीप सदावर्ते आणि अल्का सदावर्ते यांच्या अथक परिश्रमाचे द्योतक असल्याचे प्रतिपादन वंदना चटप यांनी केले. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर दिलीप सदावर्ते, पत्रकार अनिल बाळसराफ, अल्का सदावर्ते, संध्या बाळसराफ उपस्थित होत्या. (Gurupurnima Utsav of Swarapreeti Kala Akademi)

        कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला हारार्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी आरोही चमूच्या विना देशकर, अनु समर्थ, विद्या जयपूरकर, सुनीता चन्ने, लता ठाकरे, नंदीनी नैताम, अर्चना जुनघरे, सुनीता कुंभारे सरिता हिंगाणे, लता कुळमेथे, मीरा कुळकर्णी यांनी सुमधूर आवाजात  स्वागतगीत आणि प्रार्थना सादर केल्या. (Distribution of certificates to students)

        या कार्यक्रमात सेवानिवृत्त झालेले (Anil Balsaraf) अनिल बाळसराफ आणि सौ.संध्या बाळसराफ यांचे लहान मुलीनी औक्षण केले. यानंतर बाळसराफ दाम्पत्याचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन स्वरप्रीती अकादमी तर्फे भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात वरदा देशकर, स्वरा मारोटकर, आरुषी डावरे, रीतु दुपारे, माही तुराणकर, दिव्या ठाकरे, विरा चिल्लावार, साहस इंगळे यांनी सुंदर गीत सादर करून श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले.

        कार्यक्रमात वंदनाताई चटप यांच्या हस्ते भारतीय कला विद्यापीठ संलग्न आरोही संगीत विद्यालयातून प्रथम व द्वितीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व १९ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. आरोही संगीत विद्यालयाच्या मार्गदर्शिका व केंद्रप्रमुख अल्का सदावर्ते यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक येथे संगीत आराधना सुरू केली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वरप्रीती कला अकादमीचे अध्यक्ष दिलीप सदावर्ते, संचालन राजश्री उपगन्लावार, पाहुण्यांचा परिचय विणा देशकर आणि आभार प्रदर्शन संदीप कोंडेकर यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप दीपा प्रसाद, सुनिल प्रसाद, स्वतंत्रकुमार शुक्ला, जयश्री मंगरूळकर व  करुणा गावंडे यांनी सादर केलेल्या सुंदर गीत व गझल यांनी झाला. यावेळी पेटीवादन अल्का सदावर्ते व तबला नक्कावार यांनी केले.

        कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धनंजय डवरे, अनुष्का रैच, शुभांगी वाटेकर, स्वरूपा झंवर, समीर उपगन्लावार, वामन पुरटकर, अजय पुणेकर, मनीष मंगरूळकर, प्रविण तुराणकर, अनंता डोंगे, प्रदीप सुर्वे, मांडवकर  यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, महिला, विद्यार्थी उपस्थित होते. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top