Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्यातील नवेगाव येथील घटना आमचा विदर्भ - अविनाश रामटेके प्रतिनिधी विरुर स्टेशन (दि. 6 जुलै 2023) -         सततची नापिकी आणि कर्जबा...

राजुरा तालुक्यातील नवेगाव येथील घटना
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके प्रतिनिधी
विरुर स्टेशन (दि. 6 जुलै 2023) -
        सततची नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून नवेगाव येथील देवराव यादव दिवसे वय 59 यांनी बुधवारी मध्य रात्रीच्या सुमारास स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. राजुरा तालुक्यातील येत असलेल्या नवेगाव येथील देवराव दिवसे यांच्या मागील काही वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले. त्यामुळे त्या तिन मुलींची माया बालपणातच काळाने हिसकावून घेतली. पत्नी मरण पावली म्हणून वडिलाने जिद्द नाही सोडली नाही. आपल्या स्वतःच्या पाच एकर शेतीमध्ये राब-राब करून आपल्या मुलींना घेऊन आपल्या कुटुंबाचा गळा चालवीत होता. त्यातच काही वर्षानंतर पैई-पैई पैसा जमवून मुलींचे लग्न सुद्धा केले. पण मागील तीन ते चार वर्षापासून होत असलेली सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्रस्त होते कर्जाचा डोंगर आणि यामुळे बुधवारी मध्यरात्री रात्रीच्या सुमारास देवराव यादव दिवसे यांनी आपल्या स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नवेगाव येथे घडली. त्यांच्यावर पिक कर्ज असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी चेक केले असता त्यांच्या खिशात एक सुसाईड नोट मिळाली. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून मी स्वतः आत्महत्या करित आहे. या घटनेमुळे संपूर्ण नवेगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेतील पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल, पोलीस हवालदार देवाजी टेकाम, पोलीस शिपाई अशोक मडावी करीत आहे. (rajura) (wirur station) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top