अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे नुकसानीचे पंचनामे शासनाला अहवाल पाठविण्याच्या दिल्या सूचना
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. ३१ जुलै २०२३) -
कोरपना तालुक्यातील मौजा वडगाव येथे वीज पडून मृत्यू झालेल्या मनीषा अशोक उरकुडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन आमदार सुभाष धोटे (subhash dhote) यांनी त्यांचे सांत्वन केले. तसेच शासकीय मदतीच्या धनादेश कुटुंबीयांच्या सुपूर्त केला. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून गावातील समस्या जाणून घेतल्या आणि समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवावा याबाबत संबधीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, जेष्ठ नेते सुरेश मालेकर, उपसरपंच सुदर्शन डवरे, कोरपनाचे तहसीलदार प्रकाश वऱ्हाटकर, वडगाव चे मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी व्ही. जे.चिने, नांदा चे मंडळ अधिकारी उईके, कृषी अधिकारी ढोणे, ग्रा. प. सदस्य शामाकांत निखाडे, कैलास मेश्राम, संगीता मडावी, ग्रामसेवक कु. सारिका धात्रक, कृषी सहाय्यक तिडके, अशोक आस्कर, भोंगळे सर, रोशन आस्वले, भास्कर तुरणकर, दिगांबर लांजेकर, गुलाब जिवतोडे, शंकर उरकुडे, राहुल गाढवे, अशोक उरकुडे, वासुदेव उरकुडे यासह स्थानिक गावकरी उपस्थित होते. (Korpana) (aamcha vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.