Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मुसळधार पावसामुळे गोवरी नाल्यावरील रपटा गेला वाहून
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा-गोवरी-कवठाळा मार्गावरील वाहतूक ठप्प गोवरी परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला राजुरात पोलीस स्टेशन मार्गावर पाणीच पाणी आमचा विदर्भ - ...

राजुरा-गोवरी-कवठाळा मार्गावरील वाहतूक ठप्प
गोवरी परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला
राजुरात पोलीस स्टेशन मार्गावर पाणीच पाणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १८ जुलै २०२३) -
        तालुक्यातील गोवरी गावाजवळ असलेल्या मोठ्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम पावसाळा सुरू झाल्यानंतरही पूर्ण झाले नाही. परिणामी वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेला रपटा मंगळवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने राजुरा-गोवरी-कवठाळा या मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे गोवरी परिसरातील अनेक गावांचा राजुरा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. (Traffic on the Rajura-Gowri-Kawathala route has come to a standstill)

        राजुरा तालुक्यातील गोवरी गावाजवळ असलेल्या मोठ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम पावसाळा सुरू झाल्यानंतरही सुरूच आहे. त्यामुळे  वाहतुकीसाठी तात्पुरता स्वरूपाचा रपटा नाल्यात तयार करून त्यावरून वाहतूक सुरू होती. चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे. मात्र मंगळवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाने गोवरी गावाजवळ असलेल्या नाल्यात वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला रपटा पावसात वाहून गेल्याने राजुरा-गोवरी-कवठाळा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. राजुरा-पोवनी-कवठाळा-वनसडी या महामार्गाचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र त्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. त्याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. (Many villages in Gouri area lost contact)

        दोन महिन्यांपूर्वी सबंधित बांधकाम करणाऱ्या कंपनीने पावसाळ्यापूर्वी गोवरी येथील नाल्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र पावसाळा सुरू होऊनही पुलाचे काम पूर्ण झाले नाही. परिणामी मंगळवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यात तात्पुरत्या स्वरूपाचा तयार करण्यात आलेला रपटा पावसात वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. (Rajura) (aamcha vidarbha)


पुलाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात
        राजुरा-गोवरी-कवठाळा हा वेकोली परिसरातून जाणारा मुख्य मार्ग आहे. ग्रामीण भागातील गोवरी परिसरातील शालेय विद्यार्थी, शिक्षक, वेकोलितील कर्मचारी, शेतकरी व नागरिक दररोज कामानिमित्त राजुरा तालुका मुख्यालयाला जात असतात. परंतु गोवरी नाल्यावरील रपटा वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक करणाऱ्या नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. सोबतच राजुरा येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.


तीन वेळा रपटा गेला वाहून
        तीन वर्षापासून राजुरागोवरीकवठाळा_वनसडी मार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. परंतु काम पूर्णत्वास न आल्याने काही ठिकाणी पुलाचे काम तर काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गावर असलेल्या गोवरी गावाजवळ असलेल्या मोठ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम पावसाळा सुरू झाल्यानंतरही पूर्ण झाले नाही.त्यामुळे वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला तात्पुरता रपटा पावसात तीन वेळा वाहून गेला आहे.त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे. पुलाच्या बांधकामाला बराच उशीर झाल्याने आता पुलाअभावी नागरिकांना पावसाळ्यात मोठी कसरत करावी लागत आहे.
राजुरात पोलीस स्टेशन मार्गावर पाणीच पाणी
जिल्ह्यात काल पासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून आज सकाळी पावसाने चांगलाच जोर धरला होता परिणामी तहसील कार्यालय जवळील नाली चोकअप झाल्याने नालीतील पाणी रस्त्यावरून वाहू लागले होते. परिणामी पोलीस स्टेशन, देशपांडे वाडी कडे जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला. (Water is water on Rajurat police station road)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top