Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पांढरकवडा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फाऊंडेशनचा उपक्रम आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे चंद्रपूर (दि. १८ जुलै २०२३) -         दि एज्युकेशन सोसायटी चंद्र...

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फाऊंडेशनचा उपक्रम
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे
चंद्रपूर (दि. १८ जुलै २०२३) -
        दि एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर द्वारे संचालित न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, पांढरकवडा येथील विद्यार्थ्यांंना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्मिता चावडा यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. (An initiative of the International Human Rights Foundation)

        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अपर्णा शुक्ला होत्या. प्रमुख अतिथी स्मिता चावडा, जिल्हाध्यक्ष राजवीरसिंह ठाकूर, अनिता बोडे, पार्वती ठाकूर, भावना दुबे यांच्यासह फाऊंडेशनचे कार्यकर्ते, शिक्षक उपस्थित होते. यावेळी बोलतांना स्मिता चावडा म्हणाल्या की, विद्यार्थ्यानी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग्य अभ्यास केला तर यशस्वी होणे सहज शक्य आहे. मात्र यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, गुणग्राहकता हे गुण अंगी बाळगणे आवश्यक आहे. या शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांंना सहकार्य करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे स्मिता चावडा यांनी सांगितले. भावना दुबे यांनी विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची गरज असल्याचे सांगितले. (aamcha vidarbha)

        यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top