Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सोबत असावे : आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वरूर रोड येथे सहकारी संस्थेचे कार्यालय बांधकामाचे भुमिपुजन व शेतकरी मेळावा संपन्न आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १० जुलै २०२३) ...

वरूर रोड येथे सहकारी संस्थेचे कार्यालय बांधकामाचे भुमिपुजन व शेतकरी मेळावा संपन्न
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १० जुलै २०२३) -
         राजुरा तालुक्यातील मौजा वरुरु रोड येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कार्यालयाच्या बांधकामाचे भुमिपुजन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते संस्थेच्या कार्यालय बांधकामाचे भुमिपुजन व शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन पार पडले. या प्रसंगी उपस्थित शेतकरी बांधवांना कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना आ. धोटे म्हणाले की, आपण आदिवासी बहुल आणि बहुसंख्य रित्या शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या क्षेत्रात वास्तव्य करीत आहोत. तेव्हा या भागात काम करणाऱ्या प्रत्येक सहकारी संस्थने स्थानिक शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सोबतीला राहून त्यांना आवश्यक ती मदत कशी करता येईल यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत असे आवाहन केले. (Bhumipujan of construction of Co-operative Society office at Varur Road and Farmers meeting completed)
 
        यावेळी कार्यक्रमाचे शेतकरी मार्गदर्शक गिरीष कुलकर्णी, उपविभागीय कृषी अधिकारी, राजुरा, कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याणी गेडाम अध्यक्ष, आ.वि. का. सह. सं. मर्या., वरुर रोड, प्रमुख अतिथी सरपंच गणपत पंधरे, चेतन जयपुरकर उपाध्यक्ष, आ.वि. का. सह. सं. मर्या., अॅड. अरुण धोटे, संचालक, कृ.उ.बा.स. राजुरा, संस्थेचे संचालक अशोक देशपांडे, श्रीनिवास वल्लला, विठ्ठल किन्नाके, चंपत पंधरे, रामदास मट्टे, गौतम शिंदे, वामण कोडापे, मधुकर कुळसंगे, शैला मेश्राम यासह देवाजी भोंगळे, आबाजी धानोरकर, भाऊराव ढुमणे, सुनील चोथले, पुंजाराम बरडे, एकनाथ कारेकर, गणेश दुर्गे, मनोज मत्ते, प्रफुल्ल मुंडे यासह टेंबुरवाही, शीर्षी, बेरडी, चिचबोडी, सोनुर्ली, साखरवाही, भेदोळा व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (aamcha vidarbha) (Rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top