Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेत रोशन हावडा यशस्वी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ॲड.वामनराव चटप यांनी घरी जाऊन केला सत्कार आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १० जुलै २०२३) -          राजुरा येथील भारत चौक येथील र...

ॲड.वामनराव चटप यांनी घरी जाऊन केला सत्कार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १० जुलै २०२३) -
         राजुरा येथील भारत चौक येथील रोशन प्रकाश हावडा (Roshan Prakash Howrah) यांची नुकतीच (Examination of Chartered Accountant) चार्टर्ड अकाऊंटंट ची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली. त्याच्या या यशाबद्दल शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप (Adv. Wamanrao Chatap) यांनी त्यांचे भारत चौक येथील घरी जाऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. अत्यंत कठीण परिस्थितीत संघर्ष करीत रोशन हावडा यांनी हे यश मिळविल्याबद्दल अ‍ॅड.चटप यांनी त्याचे कौतुक केले.

        याप्रसंगी राजुरा चे माजी नगराध्यक्ष रमेश नळे यांनी पुष्पगुच्छ देऊन नगरवासीयांच्या वतीने रोशनचे अभिनंदन केले. यावेळी कृ.उ.बाजार समिती संचालक प्रभाकर ढवस, शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख शेषराव बोंडे, माजी नगरसेवक दिलीप डेरकर, मधुकर चिंचोलकर, भाऊजी कुळसंगे, शौकत अली, सारंग रामगीरवार, विदर्भ राज्य आंदोलन युवा आघाडीचे केंद्रीय उपाध्यक्ष कपिल इद्दे, नरेंद्र मोहारे, सुरेश लेखराजानी, प्रकाश हावडा, भावना हावडा, बालू आहुजा उपस्थित होते. (aamcha vidarbha) (Rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top