Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वाढदिवसानिमित्य शैक्षणिक साहित्य वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १० जुलै २०२३) -         बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा चे उपाध्यक्ष मनोहर साबनानी (Manohar...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १० जुलै २०२३) -
        बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा चे उपाध्यक्ष मनोहर साबनानी (Manohar Sabnani) यांच्या वाढदिवसानिमित्य संस्थेचे सचिव भास्करराव येसेकर यांच्या हस्ते आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन्सिल, शॉपणर, खोटरबर वाटप करण्यात आले. (Balvidya Education Broadcasting Board) (Rajura)

        साबनानी यांनी नेहमीच विध्यार्थी हित जोपासत त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी नेहमीच पुढाकार घेतात. विद्यार्थीच्या बाबतीत नेहमीच गरजूना मदतीचा हात पुढे करीत त्यांच्या शैक्षणिक विकासाकरिता प्रयत्न असतात. आदर्श मराठी प्राथमिक शाळेचे राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली तीस विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी आदर्श प्राथमिक च्या मुख्याध्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, आशादेवी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दीपक सातपुते यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top