Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: श्री दत्त व श्री साईं मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गुरु: साक्षात् परब्रह्म! श्री दत्त व श्री साईं मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत प्रतिनिधी गडचांदूर (दि. ४ जुल...
गुरु: साक्षात् परब्रह्म!
श्री दत्त व श्री साईं मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत प्रतिनिधी
गडचांदूर (दि. ४ जुलै २०२३) -
        दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. (Guru Purnima 2023) गुरु शिवाय ज्ञान नाही, ज्ञाना शिवाय आत्मा नाही, ध्यान, ज्ञान, संयम आणि कर्म ही सर्व गुरुची देणगी. आपल्या जीवनात गुरुचे स्थान हे सर्वात महत्त्वाचं स्थान समजलं जातं. एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार द्यावा अशा पद्धतीने गुरु आपल्या विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे गुरुचे आभार मानण्यासाठी म्हणून भारतात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. महाभारत या महाकाव्याचे निर्माते असलेल्या व्यास ऋषींच्या कार्याच्या स्मरणात भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. (Gadchandur)

        गडचांदूरात गुरुपौर्णिमा व आषाढी उत्सव सण २००८ पासून साजरा करण्यात येत आहे. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत दि. ३ जुलै रोजी साईराम उत्सव समिती श्री दत्त मंदिर मंडळ गडचांदूर यांच्या मार्फत श्री साईं मंदिर श्री दत्त मंदिर येथे श्री साईंराम, श्री दत्तगुरु चे अभिषेक करून नित्य नियमाने पूजा अर्चना करण्यात आली. सायंकाळी भजन व कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच महाप्रसादाचा कार्यक्रमाला सुरुवात झाली. शेकडो नागरिकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी नप उपाध्यक्ष शरद जोगी, नगरसेवक सागर ठाकुरवार, महादेव एकरे, रमेश काकडे, विनोद तराडे, गणेश सातपाडे, गौरव बंडीवार, किटू जयस्वाल, नण्या पाचभाई, गणेश चापले, शंकर क्षीरसागर, आशीष शेरकी, निखिल ठेंगणे, प्रशांत पात्रे, आशुतोष नागोसे, सुधीर पिंपळकर, सुनील झाडे, रुपेश चुदरी, रोहित शिंगाडे, रोहन काकडे, मंदिर महाराज उपाध्ये, कैलाश कुइटे, संजय पांडे, संदीप धनविजय, विठ्ठल डाखरे, अनिल पिंपळकर, दशरथ मारलुन, राजकुमार रोहने, शिवा साळवे, शिवाजी साबळे, विकी घोरे, अनिल ठाणेकर, दीपक वरभे, संतोष बुतले प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता साईंराम उत्सव समिती दत्त मंदिर गडचांदूर येथील कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी परिश्रम घेतले. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top