बीआरएसच्या नोंदणी अभियानाला मिळतोय उत्तम प्रतिसाद
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ३ जुलै २०२३) -
भारत राष्ट्र समितीची राजुरा विधानसभा क्षेत्रात जोमाने सदस्य नोंदनी सुरु असून भारत राष्ट्र समितीचे तालुका स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते याकरिता जोमाने प्रयत्न करीत आहेत. भारत राष्ट्र समितीची तालुका व शहर कार्यकारिणी रविवार दि. २ जुलै ला स्थानिक नागजी महाराज सभागृहात गठीत करण्यात आली. यावेळी विविध पक्षातील पक्षातील जवळपास १२५ हुन अधिक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश घेतला. (Admission of 125 workers from various parties in Bharat Rashtra Samithi) (rajura)
राजुरा विधानसभा क्षेत्राचे समन्वयक (anandrao angalwar) आनंदराव वाय अंगलवार, चंद्रपुर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक प्रतिक वनकर, संतोष कुळमेथे, (reshmatai chauhan) रेशमाताई चव्हाण, आशिष नामवाड, बालाजी करले, जिवती तालुका समन्वयक इस्लाम शेख, मिनाक्षी मुन, बाबूराव कम्बलवार यांनी पक्षात प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांना गुलाबी दुपट्टे गळयात घालून स्वागत करत पक्षात प्रवेश करवून घेतले.
आनंदराव अंगलवार यांनी तेलंगणातील मुख्यमंत्री के.सी.आर. (KCR) यांनी तेलंगणा राज्यातील विविध योजना, शेतकरी वर्गाला मिळत असलेली मोफत विज, मोफत पाणी, शेतिविषयक अवजारे व संसाधने, वृद्धपकाळ योजना, विधवा, अनु. जाती-जमाती, अल्पसंख्याक, बेरोजगार युवक-यूवती, विद्यार्थी, घरकूल योजना, शेतकऱ्यांकरिता पीक हमी भाव व बाजारपेठेची उपलब्धता याबाबत माहिती दिली. अंगलवार यांनी सांगितले कि लोककल्याणकारी योजना राज्यात लागूकरून सर्वसामान्य जनतेकरिता विकास साधला. तेलंगाणात दुसऱ्यांदा जनमानसात अधिराज्य गाजविणारे केसीआर यांनी राज्याचे विकास माॅडेल संपुर्ण देशात राबविण्याकरिता महाराष्ट्रातून सुरुवात केली आहे. (Telangana) (Maharashtra)
बीआरएसच्या रेशमाताई चौहान यांनीही आपल्या मार्गदर्शनात सांगितले कि, भारत राष्ट्र समितीचे धोरण गावागावात पोहाचविण्याकरिता प्रत्येक कार्यकर्ता परिश्रम घेत असून पक्षाचे धोरण व विकासकामे पाहता महिलावर्ग पक्षात वेगाने जुळत आहे. येणाऱ्या निवडणुकीत सर्वच प्रस्थापित पक्षांना सत्तेतून हद्दपार करण्याकरिता बीआरएसचे कार्य घरोघरी जाऊन समजावून सांगितले पाहिजे असे सांगितले. (rajura)
यावेळी रामपूर येथील माजी ग्रापं सदस्य, मुख्य कमेटी समन्वयक अजय साकिनाला, तालूका महिला कमेटी समन्वयक सौ.ज्योती नळे, सहसमन्वयक अनसुर्या नुती, मिना भास्कर घोडमारे, ओ.बी.सी कमेटी समन्वयक यशवंत ठोंबरे, भास्कर घोडमारे, शेतकरी समन्वयक प्रकाश चापले, बाबूराव कुम्बलवार, अनु.जाती समन्वयक शंकर पोतले, रवि पवार, राजूरा शहर समन्वयक प्रदिप पोपटे, अनु.जमाती समन्वयक शंकर आत्राम, विरूर सर्कल समन्वयक जनार्दन पुप्पलवार, शंकर झाडे व विलास लखमापुरे युवा समन्वयक व विद्यार्थी विशाल अंगलवार विद्यार्थी कमेटी समन्वयक अशी विविध कमेटी गठीत करण्यात आली. संचालन सुभाष हजारे, प्रास्ताविक सौ.रेशमाताई चव्हाण तर आभार (santosh kulmethe) संतोष कुळमेथे यांनी केले. (aamcha vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.