आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १४ मे २०२३) -
राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी संपन्न झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे विकास देवाळकर यांची सभापती तर भाजपचे संजय पावडे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर मागील अनेक वर्षांपासून प्रस्तापित असलेल्या शेतकरी संघटनेचा दणदणीत पराभव करून काँग्रेसने येथे शेतकरी परिवर्तन पॅनल च्या माध्यमातून आपला झेंडा रोवला आहे. (Congress's Vikas Devalkar is the Speaker and BJP's Sanjay Pavde is unopposed as the Deputy Speaker) (rajura )
राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती म्हणून काँग्रेसचे विकास माधव देवाळकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार सुभाष धोटे (subhash dhote) यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात त्यांचा केला. या प्रसंगी राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, शंकर बोंकुर, शंकर गोनेलवार, अभिजित धोटे, सरपंच एड. रामभाऊ देवईकर, सुरेश पावडे, धनराज चिंचोलकर, कवडू सातपुते, इर्शाद शेख उपस्थित होते.
राजुरा कृषी उत्पन्न बाजार समिती चे नवनियुक्त सभापती, उपसभापती व काँग्रेस समर्पित शेतकरी परिवर्तन पॅनलचे अँड. अरूण धोटे, उमाकांत धांडे, विनोद झाडे, आशिष नलगे, सरिता रेड्डी, तिरुपती इंदूरवार, जगदीश बुटले, लहु बोंडे, गोपाल झवर, सतिश कोमरवेल्लीवार, विठ्ठाबाई झाडे, राकेश हिंगाने, नवनाथ पिंगे यासह सर्व नवनिर्वाचित संचालकांचेही सर्व स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.