Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: लग्न समारंभ आटोपून घरी परत असताना अंगावर वीज कोसळली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोन चिमुकल्याण सह एकाच कुटुंबातील चौघांच्या दुर्दैवी मृत्यू आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स देसाईगंज (दि. २४ एप्रिल २०२३) -         अवकाळी पा...
दोन चिमुकल्याण सह एकाच कुटुंबातील चौघांच्या दुर्दैवी मृत्यू
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
देसाईगंज (दि. २४ एप्रिल २०२३) -
        अवकाळी पावसाने स्वतःचा बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या कुटुंबावर वीज पडून दोन चिमुकल्यासह पती-पत्नीच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरवाडीतील लग्न समारंभ आटोपून एकाच कुटुंबातील चौघे जण परतत होते. यावेळी अवकाळी अचानक मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला सोबत दोन चिमुकल्या असल्याने दुचाकी उभी करून चौघे झाडाखाली थांबले होते. (Unfortunate death of four of the same family including two small children) (desaiganj)

        यावेळी अचानक झाडावर वीज कोसळल्याने झाडाखाली थांबलेल्या चौघांच्याही जागी जागीच मृत्यू झाला. हृदय हेलावणारी ही घटना तालुक्यातील कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील तुळशी फाटा येथे आज सायंकाळी पावणे सहा वाजताच्या दरम्यान घडली. बाली भारत राजगडे वय २ वर्षे, देवांशी भारत राजगडे वय ४ वर्षे, अंकिता भारत राजगडे वय 29 वर्षे व भारत राजगड वय 35 वर्षे रा. आमगाव बुट्टी तालुका देसाईगंज या चौघांच्या घटनेत मृत्यू झाला. 

        भारत राजगडे यांची गळगला (तालुका कुरखेडा) ही सासुरवाडी आहे सासुरवाडीत नातेवाईकाच्या लग्नात लग्न समारंभासाठी तीन दिवसापासून भारत राजगडे पत्नी व दोन मुलीसह गेले होते. आज 24 एप्रिल ला लग्न समारंभ आटोपल्यानंतर ते दुचाकीवरून कुटुंबासह परत गावी जाण्यास निघाले असता कुरखेडा देसाईगंज मार्गावरील तुळशी फाटा येथे अचानक पाऊस सुरू झाला. 

        वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट होऊ लागल्याने रस्त्यालगत दुचाकी उभी करून ते झाडाच्या बुंध्याला थांबले तेवढ्याच वीज झाडावर कोसळली. यामुले चौघांच्याही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटने संपूर्ण कुटुंब उद्धव झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे आमगाव बुट्टी गावावर शोककडा पसरली असून माहिती मिळताच महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top