Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गडचांदूर-बीबी शेत शिवारात वीज पडून 36 मेंढ्या मृत्युमुखी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मेंढपाळाचे पाच लाखाच्या वर नुकसान आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. २४ एप्रिल २०२३) -          कोरपना तालुक्यातील ...
मेंढपाळाचे पाच लाखाच्या वर नुकसान
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. २४ एप्रिल २०२३) - 
        कोरपना तालुक्यातील नांदा-बीबी-गडचांदूर परिसरात दुपारच्या नंतर अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी गडचांदूर येथील जब्बार कुरेशी हे बीबी येथील स्वप्निल टोंगे यांच्या शेतशिवार परिसरात आपल्या मेंढ्या चारत होते. अचानकपणे मेंढ्यांच्या कडपावरती वीज कोसळल्याने 36 मेंढ्या जागीच ठार झाल्या व शिल्लक पैकी सहा ते आठ मेंढ्यांना गंभीर दुखापत झाली असून त्या सुद्धा जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. (gadchandur) (korpana) (Loss of shepherd over five lakhs)

        गडचांदूर येथील जब्बार कुरेशी यांचे जवळपास पाच लाखाच्या वरचे नुकसान झाले असून घटनेची माहिती वनविभाग व महसूल विभागाला मिळताच परिसराचे पटवारी जाधव यांनी येऊन घटना पंचनामा केला. अचानक पणे आलेल्या या अस्मानी संकटामुळे जब्बार कुरेशी यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाच्या वतीने आर्थिक मोबदला देण्यात यावा अशी मागणी नुकसानग्रस्त इसमाने केली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top