Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: इन्फंट कॉन्व्हेंट तर्फे मधुंगधा जुलमे चा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. २५ एप्रिल २०२३) -         इन्‍फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित, इन्फंट् जिजस इंग्लिश पब्लिक हायस्...
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २५ एप्रिल २०२३) -
        इन्‍फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित, इन्फंट् जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा (Infant Jesus English Public High School Rajura) येथे शिक्षक आणि पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात एमपीएससी परीक्षेत एससी कॅटेगरी मधून महाराष्ट्रात प्रथम आलेल्या इन्फंट कॉन्व्हेंट ची माजी विध्यार्थीनी कू. मधुंगधा जुलमे हीचा संस्थेचे संचालक (Ajeebhit Dhote) अजीभित धोटे यांच्या हस्ते शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सिल्वर झोन नवी दिल्ली, सायन्स ऑलिंपिड नवी दिल्ली, जिओ जीनियस कोटा राजस्थान, या परीक्षेत इन्फंट च्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळविले या सर्व विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र आणि सुवर्ण पदक देऊन सन्मान करण्यात आले. (rajura)

        या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थिती होते. कार्यक्रमाचे संचालन दीपक खाडे यांनी तर आभार प्रदर्शन हर्षा बर्डे यांनी केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top