आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २८ मे २०२३) -
1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त (WCL Ballarpur Area) वेकोली बल्लारपूर क्षेत्र कामगार उत्सव समिती तर्फे कामगार मैदान सास्ती टाऊनशिप (Sasti Township) येथे सायंकाळी 5.30 वाजता जाहीर सभा व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर सभेला माकपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेश कोपुलवार, हिराचंद बोरकुटे, जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज चद्रापूर आदी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आयटक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या 20 वर्षांपासून विविध कामगार संघटना कामगार दिनानिमित्य मोठ्या उत्साहाने कामगार दिवस साजरा करीत असतात. 1889 मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांच्या कामाचा कालावधी 8 तास असावा, याकरिता कामगारांनी आंदोलन केले होते. तेव्हा पासून 1 मे रोजी जागतिक कामगार दिवस साजरा केला जातो. पत्रकार परिषदेत आयटक कामगार संघटनेचे बल्लारपूर क्षेत्राचे विभागीय सचिव दिलीप कनकुलवार, श्रीपुरम रामलू, देवानंद पाटील, पुरुषोत्तम मोहुर्ले आदी (ITAK TRADE UNION) आयटक कामगार संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.