Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: 25 एप्रिल रोजी ऑरेंज तर पुढील चार दिवस येलो अलर्ट जारी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पाऊस, वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्...
पाऊस, वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज
नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर (दि. २४ एप्रिल २०२३) -
        (Indian Meteorological Department) भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात 24 ते 28 एप्रिल 2023 या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व जिल्‍ह्यातल एक दोन ठिकाणी विजांच्‍या कडकडाटासह मेघगर्जना, वादळ वारा (वेग 40-50 कि.मी./तास) आणि गारा पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तसेच 25 ते 28 एप्रिल 2023 या दिवसांकरीता यलो अलर्ट व दिनांक 25 एप्रिल 2023 या कालावधीकरीता ऑंरेज अलर्ट जारी केला आहे. (Administration appeals to citizens to be vigilant)

        या अनुषंगाने नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घ्‍यावी. पाऊस व गारपिटीचा अंदाज लक्षात घेता रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील (हरभरा, गहू, मोहरी, जवस इत्यादी.) पिकाची आवश्यक काळजी घ्यावी. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहावे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व विजा होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. जनावरांना मोकळ्या जागेत चारावयास सोडण्याचे टाळावे. तसेच गोठ्या मधेच चारा व पाण्याची उपलब्धता करून द्यावी.

        जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे. शेतातील पिकांची, जनावरांची आवश्यक काळजी घ्यावी व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने कळविले आहे. (District Disaster Management Office chandrapur)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top