Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गडचांदूरात मनिषभाई महाराज यांचे तीन दिवसीय संगीतमय भक्ति सत्संग कार्यक्रमाचे आयोजन संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
हंसराज अहिर यांनी दिली कार्यक्रमात भेट  आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. २४ एप्रिल २०२३) -         राष्ट्रीय मा...
हंसराज अहिर यांनी दिली कार्यक्रमात भेट 
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २४ एप्रिल २०२३) -
        राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर (Hansraj Ahir, Chairman, National Commission for Backward Classes) यांनी विठ्ठल मंदिर (Vitthal Mandir) येथील तीन दिवसीय भागवत सप्ताहाला (Bhagwat Saptah) भेट दिली व संत श्री मनिषभाई महाराज (Saint Shri Manishbhai Maharaj) यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांचा आशीर्वाद घेतला. अहिर यांनी सप्ताहाच्या कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल दिपक पुरी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आभार मानले तसेच कार्यकर्ता बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या बैठकीचे अध्यक्ष हंसराज अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, सतीश उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर, किशोर बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख, निलेश ताजने, शिवाजी सेलोकर, माहादेव एकरे, महेश शर्मा, राम सेवक मोरे, अरुण मडावी, अरुण डोहे नगरसेवक, विजय रणदिवे, रोहन काकडे, महादेव जयस्वाल, प्रतिक आदी उपस्थित होते. बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना निवळनुक संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. ही निवळणुक  पु्र्ण ताकत लाऊन लढु व विजय संपादन करु असा विश्वास व्यक्त केले. इतर विविध विषयांवर चर्चा केली व गडचांदुर, कोरपना उड्डाणपूल पिल्लरचेच होईल असा विश्वास व्यक्त केला गडचांदुर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हंसराज अहिर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आपल्या समस्या सांगितल्या. कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन नारायण हिवरकर यांनी केले तर आभार सतीश उपलंचिवार यांनी मानले. (Gadchandur)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top