डॉक्टर आणि पेशंट संबंध सुदृढ करण्यावर दिला भर
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. १९ एप्रिल २०२३) -
आय.एम.ए. चंद्रपूरच्या वर्ष 2023-24 च्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा (Inauguration ceremony of new office bearers) आय.एम.ए. हॉल गंजवार्ड चंद्रपूर (I.M.A. Hall Chandrapur) येथे नुकताच संपन्न झाला. डॉ. किर्ती साने अध्यक्ष, डॉ. कल्पना गुलवाडे सचिव, तर डॉ. अपर्णा देवईकर हयांनी कोषाध्यक्ष म्हणून शपथ घेतली. (Inauguration of Indian Medical Association completed)
समाजामध्ये डॉक्टर आणि पेशंट यांच्या संबंधातील दुरावा कमी करण्यासाठी व त्यांचा संबंध सुदृढ करण्यासाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्याचा मानस डॉ. किर्ती साने व डॉ. कल्पना गुलवाडे यांच्या समूहाने व्यक्त केला. संपूर्ण महिला डॉक्टर्स यांचा समावेश असलेली हि आय.एम.ए चंद्रपूरच्या इतिहासातील पहिलीच कार्यकारणी आहे हे विशेष.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. अल्का कुथे अध्यक्ष मेडिकोलीगल सेल आय.एम.ए. महाराष्ट्र व डॉ. वर्तिका पाटील मिसेस युनिव्हर्स वेस्ट आशिया हया प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यासोबतच आय.एम.ए. चंद्रपूरच्या नविन कार्यकारणीमध्ये अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये डॉ. प्रेरणा कोलते, डॉ. नसरीन मावानी, डॉ. प्राजक्ता अस्वार सल्लागार समिती मध्ये यांचा समावेश केला आहे.
डॉ. संजय घाटे नियोजित अध्यक्ष तर डॉ. शलाका मामीडवार, डॉ. पल्लवी इंगळे, डॉ. प्रीती चव्हाण, डॉ. ऋतुता मुंधडा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतील. महिला शाखेच्या अध्यक्ष म्हणून डॉ. करुणा रामटेके, डॉ. प्रिया शिंदे उपाध्यक्ष म्हणून आणि सचिव म्हणून डॉ. किरण जानवे हयांनी पदभार सांभाळला. डॉ. वृषाली बोंदगुलवार, डॉ. सोनाली कपूर, डॉ. यामिनी पंत, डॉ. समृध्दी आईंचवार, डॉ. विनिता सिंग दिक्षित, डॉ. समृध्दी वासनिक व डॉ. ऋचा पोडे हया सहसचिव म्हणून कामकाज पाहतील.
या कार्यक्रमाच्या उत्कृष्ठ सजावटीसाठी डॉ. पल्लवी अल्लुरवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शिल्पा मुनगंटीवार, डॉ. नगिना नायडू, डॉ. निखिल टोंगे, डॉ. भूपेश भलमे यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी आय.एम.ए. चे माजी अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, (Dr. Mangesh Gulwade) डॉ. अमोल पोद्दार, डॉ. गोपाल मुधंडा, डॉ. अशोक वासलवार, डॉ. दीपक निलावार, डॉ. राजीव देवईकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनुप पालिवाल आणि डॉ. आशिष वरखडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. कल्पना गुलवाडे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.