Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बस आणि ट्रकचा अपघात - पाच जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चालकाची चूक महागात पडली पोलिसांनी बसचालकाविरुद्ध दाखल केला गुन्हा आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर (दि. २४ एप्रिल २०२३) -         चंद...
चालकाची चूक महागात पडली
पोलिसांनी बसचालकाविरुद्ध दाखल केला गुन्हा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर (दि. २४ एप्रिल २०२३) -
        चंद्रपूर-नागपूर महामार्गावर ट्रक आणी खासगी ट्रॅव्हल्सची धडक झाली. या घटनेत ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. अपघातात चालकासह पाच जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (chandrapur - Yavatmal)

        चंद्रपूर येथून खासगी ट्रॅव्हल्स नागपूरला निघाली होती. चंद्रपूरच्या दिशेने येणारा ट्रक आणि ट्रॅव्हल्सची नंदोरी टोल नाक्याजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात प्रतीक रवींद्र आलम, अश्विनी शंकर मेश्राम, बसचालक शुभम रमेश पोलपोलवार, अतुल ठाकरे हे प्रवाशी जखमी झालेत.घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (Police Station Warora)

        या अपघातातील जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढली आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याचा सूचना पोलीस विभागाकडून वारंवार केल्या जातात. मात्र, सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने असे अपघात घडत आहेत. (Warora Upazila Hospital)

मोठी दुर्घटना टळली...
        चंद्रपूर- नागपूर महामार्गावर टोलनाक्याजवळ उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. मात्र, पुलावरून बस न नेता बस चालकाने पुलाचा खाली असलेल्या मार्गाने बस नेली. यवतमाळ जिल्ह्यातून येणाऱ्या ट्रकला धडकली. केवळ दैव बलवत्तर म्हणून प्रवाशाना किरकोळ दुखापत झाली. वरोरा पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Instead of taking the bus over the bridge, the bus driver took the bus under the bridge)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top