Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वेकोलि सुरक्षा कर्मचारी फिर्यादीच निघाला आरोपी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारपूर क्षेत्रातील पोवनी कोळसा खाणीची घटना तीन ट्रक मालकही आरोपीच्या पिंजऱ्यात पाच आरोपीना पाच दिवसाची पोलीस कोठडी आमचा विदर्भ - ब्युरो र...
बल्लारपूर क्षेत्रातील पोवनी कोळसा खाणीची घटना
तीन ट्रक मालकही आरोपीच्या पिंजऱ्यात
पाच आरोपीना पाच दिवसाची पोलीस कोठडी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा (दि. १४ मार्च २०२३) - 
        वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील पोवनी कोळसा खाणीच्या गेटवर दोन सुरक्षा रक्षकांच्या डोक्याला बंदूक लावून तीन ट्रक कोळसा चोरल्याची घटना दि. १३ मार्चच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. 

        याबाबतची तक्रार वेकोलिच्या महाराष्ट्र सुरक्षा दलाचा जवान नितीन चौधरी याने पोलिसांत केली होती. तक्रारीत सुरक्षा रक्षक नितीन चौधरी याने डोक्याला बंदूक लावल्याची बाब पोलिसांना सांगताच पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवली. या संपूर्ण घटनेचा उलगडा पोलिसांनी केला असून 

        महाराष्ट्र सुरक्षा दलाचा जवान नितीन चौधरी हाच आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणात वेकोलि सुरक्षा रक्षक, कोळश्याच्या व्यवसायात गुंतलेला इसम व तीन ट्रक मालक अशा एकूण पाच आरोपींना शिताफीने अटक केली आहे. मात्र अद्याप ट्रक चालक व अन्य काही आरोपी फरार व तिन्ही कोळसा भरलेल्या ट्रकचा अद्याप तपास करता यावा याकरिता पोलिसांनी न्यायालयात आरोपी विरुद्ध पाच दिवसाची पोलीस कोठडी मागितली, न्यायालयाने ती मंजूरही केली. 

        मिळालेल्या माहितीनुसार, वेकोलिच्या कोळसा खाणीत कार्यरत महाराष्ट्र सुरक्षा दलाचा जवान नितीन चौधरी याने राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली कि, सात अज्ञात तोंड झाकलेल्या इसमांनी त्याच्या डोक्याला बंदूक लावून दहशत निर्माण करून तीन ट्रक कोळसा भरून नेल्याची तक्रार नोंदविली. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने तपास केल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.

        पोलिसांच्या तपासात दहशत निर्माण करणारी अशी कुठलीच घटना घडली नसून सर्व काही संगनमताने झाल्याचे उघड झाले. तक्रारकर्ता आरोपी सुरक्षा जवान नितीन चौधरी याने बल्लारपूर येथील शुभम बहुरिया याचे जवळून 40 हजारांची रक्कम घेऊन त्याबदल्यात तीन ट्रक कोळसा भरून देणार असल्याचे सांगितले. मात्र हे नोंदणी न करता आलेले तीन ट्रक इतर सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले, याची माहिती सुरक्षा रक्षकांनी इतरांना दिली. मात्र तोपर्यंत हे तिन्ही ट्रक कोळसा घेऊन पसार झाले होते.

        या प्रकरणी पोलिसांनी नितीन चौधरी वय 31, शुभम बहुरिया, वय 28 राहणार बल्लारपूर, तीन ट्रक मालक परमितसिंग उर्फ प्रीतम चड्डा वय 31 राहणार बल्लारपूर, सय्यद सुहेल सय्यद कबीर वय 30 राहणार राजुरा, प्रणव ढवळे वय 34 राहणार गडचांदूर या एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने या पाचही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसानी आरोपीतांविरुद्ध हत्यार कायदा व दहशत माजविण्याचा व अन्य कलम नोंदवून तपास सुरू केला. मात्र घटनेनंतर सर्व प्रकरणाचा उलगडा झाल्याने जुने कलम वगळून भादंवी कलम 395, 353, 379 व 120 (ब) नुसार गुन्हा नोंदविला आहे. सदरची कारवाई चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक रविन्द्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा ठाणेदार योगेश्वर पारधी आणि त्यांच्या टीमने केली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top